मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार आणि फिक्सिंगचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात पसरल्याचे पुरावे देत एका इंग्रजी वृत्तवाहिनीने क्रिकेटविश्वात खळबळ माजवली आहे. १५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तब्बल २४ पेक्षा जास्तवेळा स्पॉट फिक्सिंगचे प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
वृत्तवाहिनेने अनील मुनावर नावाच्या फिक्सरची मुलाखत घेतली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, २०११-१२ सालच्या सामन्यांत इंग्लंड, आॅस्टेÑलिया, पाकिस्तान या संघाच्या काही खेळाडूंनी इतर संघांच्या काही खेळाडूंसह स्पॉट फिक्सिंग केले होते. काही सामन्यांत दोन्ही संघातील खेळाडूंनी फिक्सिंग केल्याचेही पुरावे मिळाले आहेत. या वृत्तवाहिनेने त्याचे कॉल रेकॉर्डिंग मिळवले असून यामध्ये तो एका भारतीय बुकीशी संपर्कात राहिल्याचे सिद्ध झाले. या सट्टेबाजाकडून मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंड विरुद्ध भारत (लॉडर््स), दक्षिण आफ्रिका वि. आॅस्टेÑलिया (केपटाऊन) आणि इंग्लंड वि. पाकिस्तान (यूएई) यांच्यात खेळलेल्या सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याची माहिती मिळाली.
धक्कादायक बाब म्हणजे या स्पॉट फिक्सिंगमध्ये फलंदाजांचा सहभाग जास्त आहे. यात काही स्टार फलंदाजही सहभागी असल्याने प्रकरण आणखी गंभीर बनले आहे. आयसीसीलाही हे प्रकरण आधीपासूनच माहीत होते, हेही यातून पुढे आले आहे.
मुळचा मुंबईचा असलेल्या मुनावरचे बहुतेकदा वास्तव्य दुबईत असते. या माहितीपटामध्ये त्याने २०१० पासून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिक्सिंग करत असल्याची कबुली दिली आहे. आयसीसी गेल्या आठ वर्षांपासून मुनावरच्या मागावर आहे. त्याने सहा कसोटी सामने, सहा एकदिवसीय सामने आणि तीन टी२० विश्वचषक सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याची माहिती आयसीसीला मिळाली. यावेळी वृत्तवाहिनेला मुनावर आणि काही स्टार क्रिकेटपटूंची छायाचित्रेही मिळली असून यामध्ये भारताचा विराट कोहली, रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा उमर अकमल यांचा समावेश आहे. मात्र या तिघांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचेही या वृत्तवाहिनेने स्पष्ट केले आहे.
Web Title: Spot-fixing took place in 15 international matches in eight years
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.