जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 59 लाख 20,258 इतका झाला आहे. त्यापैकी 25 लाख 92,085 रुग्ण बरे झाले असून 3लाख 62,365 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 65,829 वर पोहोचला आहे. त्यापैकी 71 हजार 106 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 4713 रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे. जगभरात थैमान घालणारा हा व्हायरस चीनच्या वुहान शहरातून पसरला. पण, आता हे शहर कोरोनामुक्त झाले आहे. गुरुवारीत चीनमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंगनं चीनवर टीका केली आहे. त्यानं सोशल मीडियावर त्याचा राग व्यक्त केला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं वेळापत्रक अंतिम नाही; BCCI ने दिले महत्त्वाचे संकेत
भज्जीनं ट्विट केलं की,''जगभरात कोरोना व्हायरस पसरवण्याचा त्यांचा प्लान होता. संपूर्ण जग या संकटाशी लढतंय आणि चीन आनंदात जगत आहे. PPE किट, मास्क तयार करून जगाला विकत आहेत. स्वतःची आर्थिक परिस्थिती बळकट करत आहेत.''
यापूर्वी पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर यानेही चीनवर टीका केली होती. ''लोकं वटवाघूळ का खातात, त्यांचे रक्त आणि लघवी का पितात? त्यामुळे कोरोना विषाणू पसरला गेला आहे. मी चिनी लोकांबद्दल बोलत आहे. त्यांनी जगाला वेठीस धरले आहे. मला अजूनही कळत नाही, तुम्ही वटवाघूळ, कुत्री-मांजरं कशी खाऊ शकता,'' असा सवाल अख्तरनं त्याच्या यू ट्यूब चॅनेलवरून विचारला आहे.( वटवाघूळ खाण्याची, त्यांचं रक्त व लघवी पिण्याची गरजच काय?; Corona Virusवरून पाक गोलंदाज भडकला )
अन्य महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा अपघात; गाडीची अवस्था पाहून उडेल थरकाप!
भाजपा खासदार गौतम गंभीरच्या वडिलांच्या गाडीची चोरी
सोशल अकाऊंटवरून पॉर्न क्लिप व्हायरल; पाकिस्तानी गोलंदाज ट्विटवर होतोय ट्रेंड!
हरभजन सिंगची मस्करी करणं विराट कोहलीला पडलं महाग; फिरकीपटूनं दिलं चॅलेंज
भारत मुद्दाम वर्ल्ड कपचा तो सामना हरला!; पाक क्रिकेटपटूच्या राजकारणाला बेन स्टोक्सचे सडेतोड उत्तर
हजार फुटांवरून त्यानं सहकाऱ्याला फेकलं; शोएब अख्तरनं शेअर केला थरकाप उडवणारा Video