Join us  

युवा फलंदाज शुबमन गिलकडे नेतृत्व; 17 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

दुलीप करंडक स्पर्धेच्या 2019-20च्या हंगामासाठी मंगळवारी निवड समितीनं तीन संघांची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 1:21 PM

Open in App

मुंबई : दुलीप करंडक स्पर्धेच्या 2019-20च्या हंगामासाठी मंगळवारी निवड समितीनं तीन संघांची घोषणा केली. 17 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत शुबमन गिल, फैज फझल आणि प्रियांक पांचाळ हे अनुक्रमे भारत ब्लू, भारत ग्रीन आणि भारत रेड संघाचे नेतृत्व सांभाळणार आहेत.  भारत ब्लू - शुबमन गिल ( कर्णधार), रुतूराज गायकवाड, रजत पाटीदार, रिकी भुई, अनमोलप्रीत सिंग, अंकित बावणे, स्नेल पटेल ( यष्टिरक्षक), श्रेयस गोपाळ, सौरभ कुमार, जलाज सक्सेना, तुषार देशपांडे, बसील थम्पी, अनिकेत चौधरी, दिवेश पठानिया, आशुतोष अमर  भारत ग्रीन - फैज फझल (कर्णधार), अक्षता रेड्डी, ध्रुव शोरेय, सिद्धेश लाड, प्रियम गर्ग, अक्षदीप नाथ, राहुल चहर, धर्मेंद्रसिन्ह जडेजा, जयंत यादव, अंकित राजपूत, इशान पोरेल, तन्वीर-उल-हक, अक्षय वाडकर (यष्टिरक्षक), राजेश मोहंती, मिलिंद कुमार.  भारत रेड - प्रियांक पांचाळ ( कर्णधार), अभिमन्यू इश्वरन, अक्षर पटेल, करुण नायर, इशान किशन ( यष्टिरक्षक), हरप्रीत सिंग भाटीया, महिपाल लोम्रोर, आदित्य सर्वटे, अक्षय वाखरे, वरुण आरोन, रोनित मोरे, जयदेव उनाडकत, संदीप वॉरियर, अंकित कलसी.

टॅग्स :बीसीसीआयशुभमन गिल