कोण कोणाची विकेट काढणार? उनाडकट-शार्दुलमध्ये एका स्थानासाठी चुरस; संयोजनाची डोकेदुखी

नवी दिल्ली : वनडे विश्वचषकासाठी आता ५७ दिवस शिल्लक आहेत. भारतीय संघ विंडीज दौऱ्यात व्यस्त असून विश्वचषकाच्या आधीपर्यंत द्विपक्षीय ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 05:37 AM2023-08-09T05:37:11+5:302023-08-09T05:37:28+5:30

whatsapp join usJoin us
Square for a position in Unadkat-Shardul for worldcup selection | कोण कोणाची विकेट काढणार? उनाडकट-शार्दुलमध्ये एका स्थानासाठी चुरस; संयोजनाची डोकेदुखी

कोण कोणाची विकेट काढणार? उनाडकट-शार्दुलमध्ये एका स्थानासाठी चुरस; संयोजनाची डोकेदुखी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : वनडे विश्वचषकासाठी आता ५७ दिवस शिल्लक आहेत. भारतीय संघ विंडीज दौऱ्यात व्यस्त असून विश्वचषकाच्या आधीपर्यंत द्विपक्षीय मालिकेत व्यस्त असणार आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी १५ सदस्यांचा संघ निवडणार कसा? या संघाची अंतिम घोषणा होणार कधी? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याचवेळी अतिरिक्त गोलंदाज खेळवायचा झाल्यास डावखुरा वेगवान जयदेव उनाडकट आणि ‘पालघर एक्स्प्रेस’ अशी ओळख असलेला शार्दुल ठाकूर यांच्यात चुरस पाहायला मिळेल.

आयसीसीला १५ सदस्यांचा संघ ५ सप्टेंबरपर्यंत सोपवायचा आहे. अंतिम संघ सोपविण्याची तारीख २७ सप्टेंबर असेल. यादरम्यान ज्या संघांना बदल करायचे असतील ते बदल करू शकतील.  विशेष असे की भारत-ऑस्ट्रेलिया मालिका २७ सप्टेंबरला संपेल. अशावेळी आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी भारताने १६ ते १८ खेळाडू निवडल्यास आश्चर्य वाटू नये. उनाडकट आणि शार्दुल यांना लंकेत आयोजित आशिया चषक तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात संधी मिळणे निश्चित मानले जाते. भारताचा विश्वचषकात पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत होईल. या सामन्यासाठी दोन महिने शिल्लक असताना संयोजन बनलेले नाही. 

लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर हे उपलब्ध झाल्यास भारत जेतेपदाच्या शर्यतीत असेल. पण गोलंदाजीचे काय? मंद खेळपट्ट्यांवर अतिरिक्त वेगवान गोलंदाज आणि तिसरा फिरकीपटू कोण, हे ठरवावे लागेल. जसप्रीत बुमराह दुखापतीतून परतला. ८० टक्के फिट असेल तरच तो विश्वचषक खेळेल. 

Web Title: Square for a position in Unadkat-Shardul for worldcup selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.