मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत हा महिनाभार तिहार जेलमध्ये होता. यावेळी त्याला भयानक माणसं भेटली. या कुख्यात व्यक्तींनी श्रीसंतचा छळ केला. श्रीसंतला जेलमध्ये झोपही लागत नव्हती आणि तो आपल्या आयुष्याला कंटाळला होता. यावेळीच जवळपास पाचवेळा श्रीसंतच्या डोक्यात तब्बल पाचवेळा आत्महत्येचा विचार आला होता. श्रीसंत तिहार जेलमधल्या काळ्याकुट्ट आठवणी सांगाताना फारच भावुक झाला होता.
आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामध्ये श्रीसंतवर गुन्हा दाखल केला होता. मुंबईमध्ये येऊन दिल्ली पोलिसांनी श्रीसंतला अटक केली होती. त्यानंतर तो जवळपास एक महिना तिहार जेलमध्ये होता. यावेळी श्रीसंतचे मानसीक संतुलन ढासळले होते. त्यामुळे श्रीसंतच्या डोक्यात पाचवेळा आत्महत्येचा विचार आला होता.
याबाबत श्रीसंत म्हणाला की, " मी 26 दिवस तिहार जेलमध्ये होतो. त्यावेळी तिथे खून आणि बलात्कार केलेले आरोपी माझ्याबरोबर होते. ते प्रत्येक वाक्यामध्ये मला शिव्या द्यायचे. मी त्यांच्या बोलायला गेल्यावर त्यांनी मला बऱ्याच शिव्या घातल्या. त्यानंतर माझे मानसीक संतुन ढासळले होते. त्यामुळे जेलमधून बाहेर आल्यावर मी डिप्रेशनमध्ये गेले होतो."
आपल्याला भाजपामध्ये प्रवेश करायचा आहे, हे भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने ठरवले आहे. सध्याच्या घडीला श्रीसंतवर 2020 सालापर्यंत बंदी आहे. पण त्यानंतर 2024 साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी श्रीसंतला तिरुवनंतपुरम येथून लढायचे आहे. तिरुवनंतपुरम हा शशि थरूर यांचा मतदार संघ आहे आणि श्रीसंतला थरूर यांनाच पराभूत करायचे आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेला भारताचा गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. बीसीसीआयच्या लोकपालानं श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवून ती सात वर्षांची केली आणि ही बंदी पुढील वर्षी संपणार आहे. त्यानंतर श्रीसंत कदाचित क्रिकेटमध्ये पुन्हा परतलेला पाहायला मिळेल. पण, त्याच्या मनात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग संघाबद्दल असलेला तिरस्कार कायम राहणार आहे आणि हे श्रीसंतनेच सांगितले आहे.2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतचा सहभाग समोर आल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली. केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवरील आजीवन बंदी उठविताना मॅच फिक्सिंगमध्ये त्याचा सहभाग असल्याचे कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत, असे स्पष्ट केले. न्या. ए मोहम्मद मुश्ताक यांनी बीसीसीआयकडून श्रीशांतविरुद्ध करण्यात आलेली सर्वच कारवाई रद्दबातल केली. निकालानंतर आनंदी झालेल्या श्रीशांतने क्रिकेटमधील ‘दुस-या इनिंग’ला सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी केरळ क्रिकेट संघात स्थान मिळविणे हे पहिले लक्ष्य असेल असे म्हटले होते. श्रीशांत पुन्हा केरळ संघात दिसावा यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेतही केसीएने आधीच दिले आहेत.
Web Title: Sreesanth had thought of suicide five times
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.