हैदराबाद - क्रिकेटचा सामना म्हणजे भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी जीव की प्राण. त्यात आयपीएलचे सामने म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. हे सामने पाहण्यासाठी वाटेल तेवढा त्रास सहन करण्यास तयार असतात. पण काल हैदराबाद आणि पंजाबच्या संघांमध्ये झालेल्या सामन्यात असे काही झाले की त्यामुळे प्रेक्षकांना सामना अर्ध्यावर टाकून पळ काढावा लागला.
त्याचे झाले असे की, हैदराबाद आणि पंजाबचा सामना ऐन रंगात आला असताना मैदानात डासांचे गुणगुणने सुरू झाले. या डासांनी सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना फोडून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनी सामना अर्ध्यावर टाकून घरी जाणे पसंद केले. काही चिवट क्रिकेटप्रेमींनी डासांना पळून लावण्यासाठी आग पेटवून धूर केला. मात्र आयोजकांनी कोणतीही व्यवस्था न केल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
या डासांचा त्रास केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही झाला. स्टेडियममध्ये तैनास असलेले 250 सुरक्षा रक्षक, 329 वाहतूक पोलीस आणि 1038 कायदा आणि सुव्यवस्था राखणारे पोलीस अशा पोलिसांनी क्रीम लावून सुरक्षाव्यवस्था पाहिली. दरम्यान, हैदराबाद आणि पंजाबमधील या सामन्यात हैदराबादने 13 धावांनी बाजी मारली.
Web Title: SRH & KXIP Match News
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.