चेन्नई विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादच्या १३५ धावांचे आव्हान धोनीच्या संघाने सहज पार केले. त्यामुळे, IPL स्पर्धेतील २९ व्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत पुन्हा एकदा हैदराबाद सनरायजर्सचा पराभव केला आहे. चेन्नईकडून सलामीवीर डेवॉन कॉनवेने अर्धशतकी खेळी केली. तर, ऋुतूराज गायकवाड ३५ धावांवर बाद झाला. ऋुतूराजनंतर अजिंक्य रहाणेही केवळ ९ धावा करुन तंबूत परतला. त्यामुळे, डेवॉनने एकतर्फी खिंड लढवत चेन्नईला विजय मिळवून दिला. डेवॉनने ५७ चेंडूत ७७ धावा काढल्या, त्यात १२ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.
चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर हैदराबादच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एडेन मार्कमच्या नेतृत्त्वात उतरलेल्या हैदराबाद संघाला २० षटकांत १३४ धावा काढता आल्या. त्यामुळे, धोनीच्या संघामुळे विजयासाठी १३५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे. विजयासाठीच्या १३५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या धोनीच्या संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात १८.४ षटकांत सामना जिंकला. सीएसकेने ७ गडी राखून हैदराबादवर विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने यंदाच्या आयपीएलमधील सामना विजयाचा चौकार ठोकला आहे. यंदाच्या हंगामातील एकूण ६ पैकी ४ सामने चेन्नईने जिंकले आहेत.
दरम्यान, चेन्नईने आयपीएल सामन्यात आजच्या विजयासह १५ वेळा सनरायजर्स हैदराबादला नमवलं आहे. तर, २० पैकी ५ सामन्यात हैदरबादला विजय मिळाला आहे.
१३५ धावांचे लक्ष्य
कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे, सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज फटकेबाजी करण्यासाठी मैदानात उतरले. मात्र, हैदराबादला २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावाच काढता आल्या. हैदराबादला १५० धावांचाही पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे, चेन्नईसाठी मोठं आव्हान ठेवण्यात हैदराबाद संघ अपयशी ठरला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ३४ धावा केल्या. त्यानंतर, राहुल त्रिपाठी २१ आणि हॅरी ब्रुकने १८ धावा केल्या आहेत.
जडेजाने घेतले ३ बळी
चेन्नईकडून रविंद्र जडेजाची जादू चालली असून जडेजाने ४ षटकांत केवळ २२ धाव देत तब्बल ३ विकेट घेतल्या. जडेजाच्या गोलंदाजीमुळे हैदराबादचा संघ कमी धावात तंबूत परतला. आकाश सिंग, महेश किक्षणा आणि मतिशा पार्थिराना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे, हैदराबादला २० षटकांत १३४ धावांवर रोखण्यात आले. आता, चेन्नईला विजयासाठी २० षटकांत १३५ धावा करायच्या आहेत.