ठळक मुद्देवानखेडे स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या या लढतीतील विजेता संघ थेट २७ मे रोजी खेळल्या जाणाºया अंतिम लढतीसाठी पात्र ठरेल.
अंतिम फेरीत पोहोचल्यावर चेन्नईच्या खेळाडूंनी असा केला आनंद साजरा... पाहा व्हीडीओ
चेन्नई अंतिम फेरीत दाखल; फॅफ ड्यू प्लेसिसची झुंजार खेळी
मुंबई : फॅफ ड्यू प्लेसिसच्या झुंजार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला. क्लालिफायरच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नईपुढे 140 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत होते. पण फॅफने मात्र हार मानली नाही. अखेरच्या षटकापर्यंत तो लढला आणि संघाला विजयाचे तोरण बांधून दिले. अखेरच्या षटकात दमदार षटकार ठोकत फॅफनेच चेन्नईला दोन विकेट्स राखून विजय मिळवून दिला. फॅफने 42 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 67 धावांची दमदार खेळी साकारली.
10.42 PM : चेन्नईचा हैदराबादवर दोन विकेट्स राखून विजय
10.39 PM : चेन्नईला विजयासाठी 6 चेंडूंत 6 धावांची गरज
10.30 PM : चेन्नईला आठवा धक्का; हरभजन सिंग बाद
10.28 PM : फॅफ ड्यू प्लेसिसचे षटकारासह अर्धशतक
10.24 PM : चेन्नईला विजयासाठी 18 चेंडूंत 43 धावांची गरज
10.11 PM : चेन्नईला सातवा धक्का; दीपक चहार बाद
9.59 PM : चेन्नईला सहावा धक्का; रवींद्र जडेजा बाद
9.53 PM : चेन्नईला पाचवा धक्का, ड्वेन ब्राव्हो बाद
9.45 PM : चेन्नई 10 षटकांत 4 बाद 50
9.30 PM : महेंद्रसिंग धोनी BOLD; चेन्नईला मोठा धक्का
9.14 PM : चेन्नईला सलग दुसरा धक्का; अंबाती रायुडू BOLD
9.12 PM : सुरेश रैना क्लीन बोल्ड; चेन्नईला दुसरा धक्का
चेन्नईच्या खेळाडूंनी वानखेडेवर कसे केले सेलिब्रेशन... पाहा हा व्हीडीओ
9.03 PM : सुरेश रैनाची चौकारांची हॅट्ट्रिक
- सुरेश रैनाने दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर दमदार सलग तीन चौकार वसूल केले.
8.58 PM : पहिल्याच षटकात वॉटसन बाद, चेन्नईला पहिला धक्का
ब्रेथवेटची धडाकेबाज फलंदाजी; हैदराबादचे चेन्नईपुढे 140 धावांचे आव्हान
मुंबई : कार्लोस ब्रेथवेटने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादला पहिल्या क्लालिफायर सामन्यात 139 धावा करता आल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत हैदराबादच्या धावसंख्येला खीळ बसवली होती. हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही, पण 24 धावांची खेळी साकारूनही त्याने ऑरेंज कॅप पटकावली. ब्रेथवेटने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली. ब्रेथवेटने 29 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 43 धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच हैदराबादला 139 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
8.40 PM : हैदराबादचे चेन्नईपुढे 140 धावांचे आव्हान
ब्राव्होने टीपलेला अफलातून झेल पाहा
8.13 PM : ब्राव्होचा अफलातून झेल; युसूफ पठाण बाद
8.08 PM : रवींद्र जडेजाचा भेदक मारा; चार षटकांत फक्त 13 धावा देत एक बळी
7.58 PM : हैदराबादला पाचवा धक्का; मनीष पांडे बाद
- रवींद्र जडेजाने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल पकडत मनीष पांडेला तंबूचा रस्ता दाखवला. हैदरबादला हा पाचवा धक्का होता. हैदराबाद 12 षटकांत 5 बाद 69.
ब्राव्होने शकिब अल हसनला बाद केल्यावर कसा डान्स केला तो पाहा...
7.37 PM : हैदराबादला चौथा धक्का; शकिब अल हसन OUT
- ड्वेन ब्राव्होने धोनीकरवी शकिब अल हसनला बाद करत हैदराबादला चौथा धक्का दिला. शकिबने 10 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 12 धावा केल्या.
7.24 PM : हैदराबादला हादरा; केन विल्यम्सन OUT
- शार्दुल ठाकूरने केन विल्यम्सनला बाद करत हैदराबादला मोठा हादरा दिला. विल्यम्सनने 15 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर 24 धावा केल्या.
7.22 PM : हैदराबादला दुसरा धक्का; श्रीवत्स गोस्वामी बाद
- लुंगी एनगिडीने चौथ्या षटकात स्वत:च्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल टीपला. गोस्वामीला 12 धावा करता आल्या.
7.07 PM : पहिल्याच षटकात केन विल्यम्सनचे सलग तीन चौकार
- पहिल्या चेंडूवरच धवनच्या रुपात हैदराबादला धक्का बसला असला तरी त्याचे दडपण कर्णधार केन विल्यम्सनने घेतले नाही. पहिल्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर त्याने चौकार लगावले.
7.01 PM : शिखर धवन बाद; हैदराबादला मोठा धक्का
- सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहारने शिखर धवनला त्रिफळाचीत केले. हैदराबादसाठी हा मोठा धक्का होता.
6.55 : चेन्नईच्या संघात शेन वॉटसनचे पुनरागमन
6.30 PM : चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले
अंतिम फेरीसाठी हैदराबाद - चेन्नई वानखेडे स्टेडियमवर भिडणार
मुंबई : कॅप्टन कूल धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स आणि साखळी फेरीत अव्वल स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान आज, मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीगचा पहिला क्वालिफायर रंगतो आहे. उभय संघ अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी खेळणार असल्यामुळे या लढतीत चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळेल. साखळी फेरीत उभय संघांनी प्रत्येकी १८ गुणांची कमाई केली, पण नेटरनरेटच्या आधारावर हैदराबाद संघाने अव्वल स्थान पटकावले. वानखेडे स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या या लढतीतील विजेता संघ थेट २७ मे रोजी खेळल्या जाणाºया अंतिम लढतीसाठी पात्र ठरेल. अंतिम लढत याच मैदानावर होणार आहे. पराभूत होणाºया संघाला कोलकातामध्ये २५ मे रोजी दुसरा क्वालिफायर खेळावा लागेल.
दोन्ही संघ
Web Title: SRH vs CSK, IPL 2018 LIVE UPDATE: Shane Watson's return to Chennai team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.