IPL स्पर्धेतील 29 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि हैदराबाद सनरायर्सविरुद्ध यांच्यात होत आहे. महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. मात्र, हैदराबादच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एडेन मार्कमच्या नेतृत्त्वात उतरलेल्या हैदराबाद संघाला २० षटकांत १३४ धावा काढता आल्या. त्यामुळे, धोनीच्या संघामुळे विजयासाठी १३५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.
कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे, सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज फटकेबाजी करण्यासाठी मैदानात उतरले. मात्र, हैदराबादला २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावाच काढता आल्या. हैदराबादला १५० धावांचाही पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे, चेन्नईसाठी मोठं आव्हान ठेवण्यात हैदराबाद संघ अपयशी ठरला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ३४ धावा केल्या. त्यानंतर, राहुल त्रिपाठी २१ आणि हॅरी ब्रुकने १८ धावा केल्या आहेत.
चेन्नईकडून रविंद्र जडेजाची जादू चालली असून जडेजाने ४ षटकांत केवळ २२ धाव देत तब्बल ३ विकेट घेतल्या. जडेजाच्या गोलंदाजीमुळे हैदराबादचा संघ कमी धावात तंबूत परतला. आकाश सिंग, महेश किक्षणा आणि मतिशा पार्थिराना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे, हैदराबादला २० षटकांत १३४ धावांवर रोखण्यात आले. आता, चेन्नईला विजयासाठी २० षटकांत १३५ धावा करायच्या आहेत.