Join us  

SRH vs DC Latest News : SRH To SRH; कागिसो रबाडाच्या विक्रमी कामगिरीला लागला 'ब्रेक', अजब योगायोग!

वॉर्नर आणि सहा यांच्य फटकेबाजीनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ७७ धावा चोपल्या. IPL 2020मधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. वॉर्नर आणि सहा यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला.  

By स्वदेश घाणेकर | Published: October 27, 2020 9:30 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) आतापर्यंत गोलंदाजाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) च्या सलामीवीरांनी धुलाई केली. IPL 2020मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या वृद्धीमान सहानं ( Wriddhiman Saha) DCच्या गोलंदाजांना धुण्याची सुरुवात केली, मग दुसऱ्या बाजूला असलेल्या डेव्हिड वॉर्नरनेही ( David Warner) हात धूतले... त्यानंतर मनीष पांडेनंही फटकेबाजी करताना हैदराबादला २ बाद २१९ धावांपर्यंत मजल मारून दिली. हैदराबादच्या फलंदाजांच्या फटकेबाजीनं पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या कागिसो रबाडाच्या ( Kagiso Rabada) विक्रमाला ब्रेक लावला. 

वॉर्नर आणि सहा यांच्य फटकेबाजीनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ७७ धावा चोपल्या. IPL 2020मधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. वॉर्नर आणि सहा यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला.  वॉर्नर ३४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. वॉर्नर माघारी परतल्यानंतरही सहाचा झंझावात कायम होता. सहानं ४५ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ८७ धावा चोपल्या. मनीष पांडेनं फटकेबाजी करून हैदराबादला २ बाद २१९ धावांचा डोंगर उभा करून दिला. पांडे आणि केन विलियम्सन यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ४९ धावांची भागीदारी केली. पांडे ३१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर नाबाद राहिला, तर केन ११ धावांवर नाबाद राहिला. 

दिल्लीचा प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडाने ४ षटकांत एकही विकेट न घेता ५४ धावा दिल्या. २५ डावांनंतर प्रथमच कागिसोला सामन्यात एकही विकेट घेण्यात अपयश आलं. २ मे २०१७मध्ये त्यानं सनरायझर्स हैदराबादविरुद्धच ०/५९ अशी कामगिरी केली होती. त्यानंतर त्यानं २५ डावांत किमान एक विकेट घेण्याची मालिका कायम राखली होती. हैदराबादनंच तिला ब्रेक लावला. 

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्स