हैदराबादवर विजयासह कोलकाता प्ले ऑफमध्ये दाखल
हैदराबाद : अव्वल स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबादवर पाच विकेट्स राखून सहज विजय मिळवत कोलकाता नाईट रायडर्सने प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 172 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने दिमाखदार सुरुवात केली. ख्रिस लिनने 55 धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह कोलकात्याचे 16 गुण झाले आहेत.
11.46 PM : कोलकात्याचा हैदराबादवर पाच विकेट्स राखून विजय
11.44 PM : कोलकात्याला विजयासाठी एका धावेची गरज
11.43 PM : कोलकात्याला विजयासाठी 6 चेंडूंत 5 धावांची गरज
11.35 PM : कोलकात्याला चौथा धक्का; आंद्रे रसेल बाद
11.25 PM : कोलकात्याला तिसरा धक्का; उथप्पा बाद
11.06 PM : ख्रिस लिनचा मनीष पांडेकडून अप्रतिम झेल
10.55 PM : योगायोग... षटकारासह ख्रिस लिनचे अर्धशतक आणि संघाचे शतक पूर्ण
10.40 PM : कोलतकाता 10 षटकांत 1 बाद 90
10.24 PM : सुनील नरिन OUT; कोलकात्याला पहिला धक्का
10.23 PM : सुनील नरिनच्या षटकारासह कोलकाताचे अर्धशतक
10.14 PM : सुनील नरिनचे सलग तीन चौकार
9.52 pM : हैदराबादचे कोलकातापुढे 173 धावांचे आव्हान
9.49 PM : हैदराबादला सातवा धक्का; शकिब अल हसन बाद
9.46 PM : हैदराबादला सहावा धक्का; मनीष पांडे बाद
9.38 PM : हैदराबादला पाचवा धक्का; क्रेग ब्रेथवेट बाद
9.29 PM : युसूफ पठाण बाद; हैदराबादला चौथा धक्का
9.24 PM : अर्धशतकवीर शिखर धवन बाद; हैदराबादला मोठा धक्का
9.15 PM : शिखर धवनचे दमदार अर्धशतक
9.00PM : हैदराबादला मोठा धक्का; केन विल्यम्सन बाद
हैदराबादच्या ' ऑरेंज आर्मी' मध्ये सामील झाली ही ' फुलराणी' ... पाहा नेमकी कोण...
8.43 PM : हैदराबादला पहिला धक्का; श्रीवत्स गोस्वामी बाद
8.30 PM : शिखर धवनचा दमदार षटकार
8.24 PM : हैदराबाद पाच षटकांत बिनबाद 51
8.10 PM : शिखर धवनची दमदार फलंदाजी; दुसऱ्या षटकात दोन चौकार
7.30 PM : हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली
प्ले आॅफमध्ये पोहोचण्यासाठी केकेआरला विजय महत्वाचा; आज हैदराबादशी सामना
हैदराबाद : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल-११ च्या प्ले आॅफचा मार्ग सोपा करायचा झाल्यास आज शनिवारी सनरायझर्स हैदराबादवर विजय नोंदवावाच लागेल. सनरायझर्सचे १३ सामन्यात नऊ विजयासह १८ गुण असून काल आरसीबीकडून झालेल्या पराभवानंतरही या संघाचा आत्मविश्वास कायम आहे. केकेआरविरुद्ध थोडीशी शिथिलता त्यांना महागडी ठरू शकते.
दोन्ही संघ