हैदराबादचे विजयाचे सेलिब्रेशन... पाहा हा व्हीडीओ
रशिद खान, हैदराबादची शान... कोलकात्यावर मात करत सनरायझर्स अंतिम फेरीत
कोलकाता : सनरायझर्स हैदराबादच्या विजयाचा नायक ठरला तो रशिद खान. संघाला गरज असताना त्याने 10 चेंडूंत चार षटकारांसह नाबाद 34 धावांची तुफानी खेळी साकारली. त्यानंतर कोलकात्याच्या तीन फलंदाजांना आपल्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर तंबूत धाडत रशिनने हैदराबादच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. प्रथम फलंदाजी करताना हैदरबादने 174 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याच्या डाव 160 धावांत आटोपला आणि हैदराबादने 14 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम फेरीत हैदराबादला चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करावे लागणार आहेत.
10.53 PM : हैदराबादचा कोलकात्यावर 14 धावांनी विजय
10.51 PM : कोलकात्याला नववा धक्का, शुभमन गिल बाद
10.49 PM : कोलकात्याला आठवा धक्का, शिवम मावी बाद
आंद्रे रसेलला बाद केल्यावर रशिदने असं केलं सेलिब्रेशन... पाहा व्हीडीओ
10.40 PM : कोलकात्याला सातवा धक्का; पीयुष चावला बाद
10.39 pm : कोलकात्याला विजयासाठी विजयासाठी 12 चेंडूंत 30 धावांची गरज
10.18 PM : BIG WICKETS... आंद्रे रसेल OUT; कोलकात्याला मोठा धक्का
10.17 PM : आंद्रे रसेलला तीन धावांवर असताना जीवदान
10.08 PM : कोलकात्याला हादरा; ख्रिस लिन 48 धावांवर OUT
10.05 PM : कोलकात्याला मोठा धक्का; दिनेश कार्तिक OUT
9.57 PM : रशिदची भेदक फिरकी, रॉबिन उथप्पा बोल्ड
9.48 PM : कोलकात्याला दुसरा धक्का; नीतीश राणा बाद
9.25 PM : कोलकात्याची धडाकेबाज फलंदाजी, पाच षटकांत 1 बाद 58
9.18 PM : कोलकात्याला मोठा धक्का; सुनील नरिन बाद
9.12 PM : ईडन गार्डन्सवर धडकले नरिन वादळ
- भुवनेश्वरच्या तिसऱ्या षटकात नरिनने लगावले तीन चौकार आणि एक षटकार.
रशिदची तुफानी फटकेबाजी! हैदराबादचे कोलकात्यापुढे 175 धावांचे आव्हान
कोलकाता - सनरायझर्स हैदराबादने क्वालिफायर 2 मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससमोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान ठेवले आहे. कोलकात्याच्या भेदक माऱ्यासमोर मधली फळी कोलमडल्यानंतर रशिद खानने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने 20 षटकात 7 बाद 174 धावा फटकावल्या. कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर शिखर धवन आणि वृद्धिमान साहाने हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मधली फळी कोलमडल्याने हैदराबादचा डाव अडचणीत आला होता. अशा परिस्थितीत रशिद खानने केवळ 10 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांसह 34 धावा कुटत हैदराबादला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
8.48 PM : हैदराबादचे कोलकात्यापुढे 175 धावांचे आव्हान
8.38 PM : हैदराबादला सातवा धक्का; युसूफ पठाण OUT
8.35 PM : हैदराबादला मोठा धक्का; कार्लोस ब्रेथवेट OUT
8.26 PM : दीपक हुडा बाद; हैदराबादला पाचवा धक्का
कार्तिकने वृद्धिमान साहाला कसे यष्टीचीत केले... पाहा हा फोटो
8.18 PM : हैदराबादला चौथा धक्का; शकिब अल हसन बाद
8.12 PM : हैदराबादच्या 14व्या षटकात 100 धावा पूर्ण
विल्यम्सनला बाद केल्यावर कुलदीपने कसे केले सेलिब्रेशन... पाहा व्हीडीओ
7.56 PM : हैदराबादला तिसरा धक्का; वृद्धिमान साहा बाद
7.52 PM : हैदराबादला 10 षटकांत 2 बाद 79
7.41 PM : केन विल्यम्सन OUT; हैदराबादला मोठा धक्का
7.36 PM : शिखर धवन OUT; हैदराबादला पहिला धक्का
हैदराबाद आणि कोलकात्याने कशी केली सामन्याची तयारी... पाहा हा व्हीडीओ
7.25 PM : हैदराबादची संयत सुरुवात; 5 षटकांत बिनबाद 40
7.15 PM : वृद्धिमान साहाला पाच धावांवर जीवदान
- हैदराबादचा सलामीवीर वृद्धिमान साहाला पाच धावांवर असताना कोलकात्याचा यष्टीरक्षक आणि कर्णधार दिनेश कार्तिकने झेल सोडत जीवदान दिले.
7.09 PM : शिखर धवनचा हैदराबादासाठी पहिला षटकार
6.30 PM : कोलकात्याने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले
अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी हैदराबाद आणि कोलकाता झुंजणार
कोलकाता : भारतातील सर्वात मोठ्या मैदानात म्हणजेच ईडन गार्डन्सवर आज ' क्वालिफायर-2 ' चा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स झुंजणार आहेत. गेल्या चार सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे या सामन्यात ते कोणत्या मानसीकतेने उतरतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. सामना ईडन गार्डन्समध्ये होणार असल्याने कोलकात्याला चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. या मैदानातच गेल्या सामन्यात कोलकात्याने राजस्थान रॉयल्सला पराभूत केले होते. त्यामुळे कोलकाताचा संघ घरच्या मैदानात सलग दुसरा विजय मिळवत अंतिम फेरीत जाणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
दोन्ही संघ
दोन्ही संघाचे ईडन गार्डन्समध्ये आगमन... पाहा हा व्हीडीओ