SRH vs KKR Latest News : प्रियम गर्गची स्टनिंग डाईव्ह; KKRचा सेट फलंदाज माघारी, Video

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 04:45 PM2020-10-18T16:45:15+5:302020-10-18T16:45:56+5:30

whatsapp join usJoin us
SRH vs KKR Latest News : A brilliant catch by Priyam Garg off Rashid Khan's bowling sees the back of Shubman Gill, Video | SRH vs KKR Latest News : प्रियम गर्गची स्टनिंग डाईव्ह; KKRचा सेट फलंदाज माघारी, Video

SRH vs KKR Latest News : प्रियम गर्गची स्टनिंग डाईव्ह; KKRचा सेट फलंदाज माघारी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRला सावध सुरुवात करून दिली. पण, पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूवर टी नटराजननं KKRला पहिला धक्का दिला. राहुल त्रिपाठी २३ धावांवर त्रिफळाचीत झाला. नितिश राणासह गिल SRHच्या गोलंदाजांचा सामना करत होता, परंतु त्यांच्या धावांचा वेग संथ वाटत होता. राशिद खाननं गिलला जीवदान दिले, परंतु १२व्या षटकांत राशिदनं त्याला बाद केले. प्रियम गर्गनं ( Priyam Garg) Stunning Running Catch घेतला. गिल ३७ चेंडूंत ५ चौकारांसह ३६ धावा करून माघारी परतला. विजय शंकरनं पुढील षटकात नितिश राणाला ( २९) बाद केले आणि त्याचाही झेल गर्गनं टिपला.



पाहा व्हिडीओ..

Sunrisers Hyderabad XI: डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियाम गर्ग, अहमद समद, विजय शंकर, राशिद खान, संदीप शर्मा, बसील थम्पी, टी नटराजन

Kolkata Knight Riders XI: राहुल त्रिपाठी, शुबमन गिल, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, ल्युकी फर्ग्युसन, कुलदीप यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्थी 

Web Title: SRH vs KKR Latest News : A brilliant catch by Priyam Garg off Rashid Khan's bowling sees the back of Shubman Gill, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.