दुबई : आयपीएल टि-20 स्पर्धेच्या 13व्या पर्वातील 22वा सामना आज सनरायझर्स हैदराबादविरुद्धकिंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी मैदानावर उतरचाच पंजाबच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढत हैदराबादला जबरदस्त सुरुवात करून दिली. दरम्यान, या जोडीने आयपीएलमध्ये 1 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. अशी कामगिरी करणारी ही आयपीएलमधील सातवी जोडी ठरली आहे.
या पूर्वी यांनी केलाय असा पराक्रम -2220 - वॉर्नर-धवन (अॅव्ह 47.23)1478 - गंभीर-उथप्पा (37.89)1363 - मॅक्युलम-डी स्मिथ (35.86)1360 - हसी-विजय (41.21)1210 - गेल-कोहली (46.53)1073 - गेल-राहुल (41.26)1000+ - वार्नर-बेअरस्टो (66.86)
सनरायझर्स हैदराबादच्या 6 शतकी भागीदारी -118 - वॉर्नर आणि बेअरस्टो110 - वॉर्नर आणि बेअरस्टो185 - वॉर्नर आणि बेअरस्टो131 - वॉर्नर आणि बेअरस्टो115 - वॉर्नर आणि पांडे100 - वॉर्नर आणि बेअरस्टो
वॉर्नर-बेअरस्टो यांच्यात 1000+ धावांची भागीदारी -कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबाद संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या दोघांनीही पावर-प्लेदरम्यान 58 धावांची खेळी केली. ही या पर्वातील हैदराबाद संघाची पावर-प्लेमधील सर्वाधिक धाव संख्या आहे. याच बरोबर वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्यात एकूण 16 डावांत एक हजारहून अधिक धानवांची भागीदारी झाली आहे. यादरम्यान या दोघांनी 5 वेळा शतकी तर 5 वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे.
पंजाबने संघात 3 बदल केले, तरी अपयश -किंग्स इलेव्हन पंजाबला आतापर्यंत पाचपैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. तर सनरायझर्सने हैदराबादने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत त्याचा पराभव झाला आहे. गुणतालिकेत हा संघ सहाव्या स्थानावर आहे. हैदराबादविरुद्धच्या आजच्या सामन्यासाठी पंजाबने संघात 3 बदल केले. मात्र, सुरुवातीच्या षटकांत हैदराबादला धक्के देण्यात त्यांना अपयश आले.