Join us  

SRH vs MI Latest News : सनरायझर्स हैदराबाद अन् Playoffs यांच्या मार्गात तगडं आव्हान; किरॉन पोलार्डचं वादळ

SRH vs MI Latest News & Live Score : Indian Premier Leagueच्या १३व्या पर्वातील प्ले ऑफसाठीचे तीन संघ निश्चित झाले आहेत. उरलेल्या एका स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे शर्यतीत आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: November 03, 2020 9:20 PM

Open in App

SRH vs MI Latest News & Live Score : Indian Premier Leagueच्या १३व्या पर्वातील प्ले ऑफसाठीचे तीन संघ निश्चित झाले आहेत. उरलेल्या एका स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे शर्यतीत आहेत. KKRचे सर्व सामने झाले आहेत आणि त्यांचे भविष्य मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि SRH यांच्या लढतीवर अवलंबून आहे. MIनं सामन्यात विजय मिळवल्यास KKR १४ गुणांसह प्ले ऑफसाठी पात्र ठरेल, परंतु SRHनं बाजी मारल्यास चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर डेव्हिड वॉर्नरचा संघ चौथे स्थान पटकावेल. त्यामुळे आजच्या सामन्यात KKRचे चाहते MIला चिअर करताना दिसतील.

दुखापतीमुळे चार सामने बाकावर बसलेल्या रोहित शर्माचे आज संघात कमबॅक झाले. SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, रोहितचं कमबॅक मुंबई इंडियन्सला फार फायद्याचे ठरले नाही. संदीप शर्मानं तिसऱ्या षटकात रोहितला ( ४) माघारी पाठवले. त्यानंतर सूर्यकुमार यादवनं चौकारानं खातं उघडलं. संदीप शर्मानं टाकलेल्या पाचव्या षटकात क्विंटन डी'कॉकनं ४,६,६ अशा धावा कुटल्या, परंतु चौथ्या चेंडूवर क्विंटन दुर्दैवी त्रिफळाचीत झाला. क्विंटन २५ धावा करून माघारी परतला. 

सूर्यकुमारनं त्याचा फॉर्म कायम राखताना IPL च्या सलग तिसऱ्या पर्वात ४००+ धावा करण्याचा पराक्रम केला. सूर्यकुमार आणि इशान किशन यांची तिसऱ्या विकेटसाठीची ४२ धावांची भागीदारी शाहबाज नदीमनं संपुष्टात आणली. वृद्धीमान साहानं चपळाईनं सूर्यकुमारला ( ३६) यष्टिचीत केलं. त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर नदीमनं MIला आणखी एक धक्का देत कृणाल पांड्याला ( ०) बाद केले. राशिद खाननं पुढच्याच षटकात सौरभ तिवारीला ( ०) बाद करून मुंबईची अवस्था ५ बाद ८२ धावा अशी केली.

राशिदनं त्याच्याच गोलंदाजीवर इशान किशनचा सोपा झेल सोडला आणि तो SRHला महागात पडला. संदीपनं टाकलेल्या १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इशाननं खणखणीत षटकार खेचला, परंतु संदीपनं कमबॅक करताना पुढच्याच चेंडूवर त्रिफळा उडवला. इशान ३३ धावांवर माघारी परतला. किरॉन पोलार्डनं १९व्या षटकात तीन सलग षटकार खेचून मुंबईला समाधानकारक पल्ला गाठून दिला. मुंबई इंडियन्सनं २० षटकांत ८ बाद १४९ धावा केल्या. पोलार्डनं २४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावा चोपल्या. 

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबादमुंबई इंडियन्सकिरॉन पोलार्ड