SRH vs MI Latest News & Live Score : Indian Premier Leagueच्या १३व्या पर्वातील प्ले ऑफसाठीचे तीन संघ निश्चित झाले आहेत. उरलेल्या एका स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे शर्यतीत आहेत. KKRचे सर्व सामने झाले आहेत आणि त्यांचे भविष्य आजच्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि SRH यांच्या लढतीवर अवलंबून आहे. MIनं आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास KKR १४ गुणांसह प्ले ऑफसाठी पात्र ठरेल, परंतु SRHनं बाजी मारल्यास चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर डेव्हिड वॉर्नरचा संघ चौथे स्थान पटकावेल. त्यामुळे आजच्या सामन्यात KKRचे चाहते MIला चिअर करताना दिसतील.
- दुखापतीमुळे चार सामने बाकावर बसलेल्या रोहित शर्माचे आज संघात कमबॅक झाले. SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
- मुंबई इंडियन्सच्या संघात तीन बदल; रोहित शर्मा, जेम्स पॅटिन्सन व धवल कुलकर्णी IN, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह OUT
- सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, वृद्घीमान साहा, मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियांम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाद नदीम, संदीप शर्मा, टी नटराजन
- मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, इशान किशन, कृणाल पांड्या, किरॉन पोलार्ड, नॅथन कोल्टर नायल, राहुल चहर, जेम्स पॅटिन्सन, धवल कुलकर्णी
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या वन डे, ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात रोहित शर्माला दुखापतीमुळे स्थान देण्यात आले नाही. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रोहित मागील चार सामन्यांत खेळलेला नाही. किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) विरुद्धच्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रींग दुखापत झाली होती. त्यानंतर तो चार सामने खेळलेला नाही. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातूनही त्याला वगळण्यात आले. पण, मयांक अग्रवाल दुखापतग्रस्त असूनही त्याला तीनही संघात स्थान दिल्यानं, निवड समितीवर टीका झाली. India Tour of Australia : रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार? सौरव गांगुलीनं दिले अपडेट्स
आज रोहित शर्मा मैदानावर उतरल्यानं नवा वाद सुरू होऊ शकतो.. नाणेफेकीनंतर मुरली कार्तिकनं रोहितला त्याच्या तंदुरुस्तीबद्दल विचारलं. त्यावर रोहित म्हणाला, हो मी तंदुरुस्त आहे असं वाटतंय...
पाहा व्हिडीओ...