SRH vs RCB Latest News : RCBचा सामना करण्यापूर्वी SRHला धक्का; अष्टपैलू खेळाडूची IPL2020तून माघार

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला शनिवारी आणखी एक मोठा धक्का बसला. मिचेल मार्श, भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर SRHच्या आणखी एका खेळाडूनं दुखापतीमुळे Indian Premier League ( IPL 2020) मधून माघार घेतली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 31, 2020 06:43 PM2020-10-31T18:43:38+5:302020-10-31T18:44:12+5:30

whatsapp join usJoin us
SRH vs RCB Latest News : SRH’s Vijay Shankar ruled out of remainder of the tournament IPL 2020 | SRH vs RCB Latest News : RCBचा सामना करण्यापूर्वी SRHला धक्का; अष्टपैलू खेळाडूची IPL2020तून माघार

SRH vs RCB Latest News : RCBचा सामना करण्यापूर्वी SRHला धक्का; अष्टपैलू खेळाडूची IPL2020तून माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला शनिवारी आणखी एक मोठा धक्का बसला. मिचेल मार्श, भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर SRHच्या आणखी एका खेळाडूनं दुखापतीमुळे Indian Premier League ( IPL 2020) मधून माघार घेतली आहे. SRHला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचं आहे, परंतु आजच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाविरुद्धच्या लढतीपूर्वी त्यांना हा मोठा धक्का बसला. SRHच्या खात्यात १२ सामन्यांत १० गुण आहेत आणि उर्वरित दोन सामने जिंकून १४ गुणांसह व नेट रन रेटच्या जोरावर त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करता येईल.

SRHचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याने हॅमस्ट्रींगच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांतून माघार घेतली. त्याला ग्रेड टू ची दुखापत झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती. DCविरुद्ध गोलंदाजी करताना त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले आणि त्यानं मैदान सोडलं होतं. त्या सामन्यात त्यानं केवळ १.५ षटकं टाकले. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं उरलेला एक चेंडू फेकला.  

SRHची डोकेदुखी इथेच थांबत नाही, तर वृद्धीमान साहा याच्याही दुखापतीनं डोकं वर काढलं आहे आणि त्यामुळे तो फलंदाजीनंतर यष्टिरक्षणाला आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत श्रीवत्स गोस्वामी यानं विकेट किपिंग केली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार  विजय शंकर अजून दुखापतीतून सावरलेला नाही आणि त्यानं आयपीएल २०२०मधून माघार घेतली आहे. त्यानं ७ सामन्यांत ९७ धावा केल्या आहेत. त्यात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अर्धशतकाचा समावेश आहे. शिवाय त्यानं चार विकेट्स घेतल्या आहेत. SRHकडून अजूनही अधिकृत वृत्त आलेले नाही. 
 

Web Title: SRH vs RCB Latest News : SRH’s Vijay Shankar ruled out of remainder of the tournament IPL 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.