SRH vs RCB Latest News : सनरायझर्स हैदराबादनं थेट चौथ्या स्थानी झेप घेतली; इतरांची धाकधुक वाढवली!

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचं होतं. त्याच निर्धारानं मैदानावर उतरलेल्या SRHनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला धक्का दिला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 31, 2020 10:46 PM2020-10-31T22:46:55+5:302020-10-31T22:50:38+5:30

whatsapp join usJoin us
SRH vs RCB Latest News : Sunrisers Hyderabad won by 5 wickets, jumped on fourth spot in IPL 2020 Point Table  | SRH vs RCB Latest News : सनरायझर्स हैदराबादनं थेट चौथ्या स्थानी झेप घेतली; इतरांची धाकधुक वाढवली!

SRH vs RCB Latest News : सनरायझर्स हैदराबादनं थेट चौथ्या स्थानी झेप घेतली; इतरांची धाकधुक वाढवली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचं होतं. त्याच निर्धारानं मैदानावर उतरलेल्या SRHनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला धक्का दिला. संदीप शर्मानं ( Sandeep Sharma) व जेसन होल्डर यांच्यासह SRHच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना RCBला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. प्रत्युत्तरात SRHलाही सुरुवातीला धक्के बसले, परंतु मनीष पांडे व वृद्धीमान सहा यांनी त्यांची गाडी रुळावर आणली. हैदराबादनं हा सामना सहज जिंकून सर्वोत्तम नेट रन रेटच्या जोरावर चौथ्या स्थानावर झेप घेतली. हैदराबादच्या या गरूड भरारीनं अन्य संघांची धाकधुक वाढवली. 

संदीप शर्मानं तिसऱ्या षटकात देवदत्त पडीक्कलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पाचव्या षटकात विराट कोहलीला त्यानं केन विलियम्सनकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. RCBचे दोन फलंदाज २८ धावांवर माघारी परतले होते. देवदत्त व विराट माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेल्या एबीनं चौथी धाव घेताच ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा पल्ला पार केला. ही कामगिरी करणारा तो ८वा फलंदाज ठरला. एबी डिव्हिलियर्स २४ धावा करून शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यापाठोपाठ राशिद खाननं RCBच्या जोश फिलिफला ( ३२) बाद केले. त्यानंतर RCBला सावरता आले नाही. त्यांना ७ बाद १२० धावांवर समाधान मानावे लागले.

प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर ( ८) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. २०१६नंतर वॉर्नर प्रथमच पहिल्या पॉवर प्लेमध्ये फिरकीपटूच्या गोलंदाजीवर बाद झाला. वॉशिंग्टन सूंदरनं त्याला बाद केले. त्यानंतर वृद्घीमान सहा व मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना SRHची गाडी रुळावर आणली. मनीष २६ धावांवर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. सहानं केन विलियम्सनसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु चहलनं त्यालाही ३९ धावांवर बाद केले. उडानानं पुढील षटकात केनला ( ८)  बाद केले. येथे सामन्याला कलाटणी मिळेल असे वाटले होते, परंतु जेसन होल्डरनं फटकेबाजी करून SRHला विजय मिळवून दिला.  होल्डरनं १० चेंडूंत १ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद २६ धावा केल्या. हैदराबादनं १४.१ षटकांत ५ बाद १२१ धावा करून विजय पक्का केला. 


 

Web Title: SRH vs RCB Latest News : Sunrisers Hyderabad won by 5 wickets, jumped on fourth spot in IPL 2020 Point Table 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.