हैदराबाद : नव्या नेतृत्वात राजस्थान आणि हैदराबाद संघ कशी कामगिरी करतील, याची उत्सुकता असेल. राजस्थान रॉयल्स संघ निलंबनाच्या कारवाईनंतर दोन वर्षांनंतर पुनरागमन करीत आहे. आयपीएलच्या 11 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या दोन्ही माजी कर्णधाराच्या अनुपस्थितीत हैदराबाद आणि राजस्थान संघ मैदानात उतरणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट बोर्डाने बंदीची कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर आयपीएलमध्येही बंदी घातली. या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थिती हैदराबाद आणि राजस्थान संघ मैदानात उतरणार आहेत. राजस्थान संघाचे नेतृत्व मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे आहे. राजस्थानचे नेतृत्व अजिंक्य रहाणे याच्याकडे तर हैदराबादचा कर्णधार म्हणून केन विलियम्सन जबाबदारी सांभाळणार आहे. हे दोघेही नवे कर्णधार असून ते संघाला विजयी सुरुवात करुन देण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघ कागदारवर संतुलित दिसत आहेत.
शेन वॉर्न राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक म्हणून परतला आहे. त्यामुळे 2008 नंतर या संघातील खेळाडू वॉर्नच्या उपस्थितीत संघाला गौरव मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. 2008मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद राजस्थान संघाने पटकाविले होते. दुसरीकडे, 2016 मध्ये आयपीएल जिंकणारा हैदराबाद संघ वॉर्नरच्या अनुपस्थितीत खेळत आहे. तो नसल्यामुळे फलंदाजी क्रमात रिकामी जागा आहे. अॅलेक्स हेल्स हा शिखर धवनसोबत चांगली सुरुवात करुन देण्यात सक्षम आहे. असे असले तरी त्याची उणीव संघाला भासेल.
- राजस्थान संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, डी'आर्की शॉर्ट, जतिन सक्सेना, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, स्टुअर्ट बिन्नी, हेनरिक क्लासेन, जोस बटलर, प्रशांत चोप्रा, संजू सॅमसन, अंकित शर्मा, अनुरीत सिंह, आर्यमान बिर्ला, बेन लॉघलीन, धवल कुलकर्णी, दुष्मांता चामीरा, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, सुधेशन मिथुन, झहीर खान, डी'आर्की शॉर्ट.
हैदराबाद संघ: केन विल्यम्सन (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, मनीष पांडे, रिकी भुई, सचिन बेबी, शिखर धवन, तन्मय अगरवाल, बिपुल शर्मा, कार्लोस ब्रॅथवेट, दीपक हुडा, मेहंदी हसन, मोहम्मद नबी, शाकीब अल हसन, यूसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, ख्रिस जॉर्डनस, खलिल अहमद, राशिद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, थंगारसू नटराजन.