दुबई : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघांपुढे इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीच्या ३ षटकांत चांगली फलंदाजी केली. मात्र चौथ्या षटकांत रॉबिन उथ्थपाला जेसन होल्डरने धावचीत झाला आणि राजस्थानला मोठा धक्का बसला. रॉबिन उथ्थपाने १३ चेंडूत १९ धावा केल्या. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकरचा समावेश आहे. उथ्थपा बाद झाल्यानंतर संजू सॅमसन फलंदाजीला आला. बेन स्टोक्सच्या मदतीनं राजस्थानने पहिल्या ६ षटकांत १ विकेट गमावून धावा ४८ केल्या. यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने थोडी सावध खेळी खेळत भागिदारी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे १० षटकांत राजस्थानने एक विकेट गमावून ७४ धावा केल्या.
संजू सॅमसनला जेसन होल्डरने १२ व्या षटकात बाद केले. संजू सॅमसनने २६ चेंडूत ३६ धावा केल्या. यानंतर पुढच्याच षटकांत राशिद खानने बेन स्टोकला बाद करत राजस्थानला तिसरा धक्का दिला. बेन स्टोक्सने ३२ चेंडूत ३० धावा केल्या. यानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीव स्मिथ आणि जॅास बटलरने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.
जॉस बटलरला विजय शंकरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. जॉस बटलरची विकेट जाणं म्हणजे राजस्थानसाठी खूप मोठा धक्का होता. त्याचप्रमाणे हैदराबादसाठी ही अत्यंत महत्वाची विकेट होती. जॉस बटलरला १२ चेंडूत फक्त ९ धावा करता आल्या.
१८ व्या षटकांत जेसन होल्डरने पुन्हा विकेट घेतली. स्मिथला होल्डरने १९ धावांवर झेलबाद केले. यानंतर रियान पराग त्याच षटकांत रियान परागलाही झेलबाद केले. वॉर्नरने अफलातून झेल घेत परागला बाद केले.
यानंतर जोफ्रा आर्चरने नेहमीप्रमाणे कमी चेंडूत स्फोटक फलंदाजी केली. आर्चरने ७ चेंडूत १६ धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला १५४ धावांवर मजल मारता आली.