Join us  

SRH vs RR Latest News : बेन स्टोक्सला सलामीला पाठवण्याचा RRचा डाव फसला, SRHनं असा काटा काढला, Video

Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)  यांच्यातल्या सामन्यात पहिल्या दहा षटकांत RRने वर्चस्व गाजवले, पण..

By स्वदेश घाणेकर | Published: October 11, 2020 5:47 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)  यांच्यातल्या सामन्यात पहिल्या दहा षटकांत RRने वर्चस्व गाजवले. पण, डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांच्या दमदार खेळीच्या जोरावर SRHनं सामन्यात पुनरागमन करताना आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात कर्णधार स्टीव्ह स्मिथनं सलामीला जोस बटलरसह IPL 2020 पहिलाच सामना खेळणाऱ्या बेन स्टोक्सला पाठवलं. पण, दुसऱ्याच षटकात खलील अहमदनं त्याचा त्रिफळा उडवला. 

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्याच षटकात वॉर्नर माघारी परतला असता, परंतु त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिंमागे गेलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात झेपावण्याआधी टप्पा खाल्ला... वॉर्नर त्यानंतर सावध पवित्र्यात दिसला. दुसरीकडे जॉनी बेअरस्टो फटकेबाजी करत होता. पाचव्या षटकात कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर बेअरस्टोनं पुल शॉट मारला आणि डिप स्क्वेअरला उभ्या असलेल्या संजू सॅमसननं ( Sanju Samson) सुरेखरित्या तो टिपून RRला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.  

१५ व्या षटकात जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) ७३ धावांची ही भागीदारी संपुष्टात आणली. आर्चर-वॉर्नर यांच्यातली ठसन या सामन्यात अनुभवायला मिळाली. आर्चरनं ३ षटकांत केवळ ६ धावा देताना वॉर्नरची महत्त्वाची विकेट घेतली. ४८ धावांवर वॉर्नरला त्यानं त्रिफळाचीत केलं. त्यानंतर मनीषचे वादळ घोंगावले. मनीषनं ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मनीषला ५४ धावांवर जयदेव उनाडकटनं माघारी पाठवले. पहिल्या तीन षटकांत केवळ ६ धावा देणाऱ्या आर्चरच्या अखेरच्या षटकात केन विलियम्सननं दोन खणखणीत षटकार खेचून १९ धावा चोपल्या. अखेरच्या षटकांत हैदराबादनं कमबॅक करताना ४ बाद १५८ समाधानकारक पल्ला गाठला.

प्रत्युत्तरात कर्णधार स्टीव्ह स्मिथनं सलामीला जोस बटलरसह IPL 2020 पहिलाच सामना खेळणाऱ्या बेन स्टोक्सला पाठवलं. स्टोक्सनं पहिल्या षटकात चौकार खेचून आक्रमक पवित्रा असल्याचे दाखवले. पण, पुढच्याच षटकात SRHचा कर्णधार वॉर्नरनं खलील अहमदला गोलंदाजीला आणले आणि त्यानं स्टोक्सला बाद केले. IPL मध्ये स्टोक्स दुसऱ्यांदा सलामीला आला. यापूर्वी २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्यानं ११ ( ७ चेंडू) धावा केल्या होत्या आणि आज ५ (६ चेंडू) धावा केल्य.  

पाहा विकेट... 

टॅग्स :IPL 2020बेन स्टोक्सराजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबाद