Join us  

SRH vs RR Latest News : डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी; IPLमध्ये असा पराक्रम करणारा सहावा फलंदाज

SRH vs RR Latest News : सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 11, 2020 3:51 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नर ( David Warner) ने सामन्याच्या तिसऱ्याच षटकात एका विक्रमाला गवसणी घातली. सनरायझर्स हैदराबाद ( SRH) कडून IPLमध्ये ३५०० धावा करण्याचा पराक्रम त्यानं नावावर केला. IPLमध्ये एकाच संघाकडून ३५००+ धावा करणारा तो सहावा फलंदाज ठरला. 

- राजस्थान रॉयल्सचा संघः जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, रियान पराग, राहुल टेवाटिया, श्रेयस गोपाळ, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी

- यशस्वी जैस्वाल, महिपाल लोम्रोर, वरूण आरोन आणि अँड्य्रू टाय OUT, बेन स्टोक्स, रियान पराग, जयदेव उनाडकट व रॉबिन उथप्पा IN

- सनरायझर्स हैदराबादः डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियाम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, रशीद खान, टी नटराजन, खलील अहमद, संदीप शर्मा 

- अब्दुल समद OUT, विजय शंकर IN 

एकाच संघाकडून कुणी किती धावा केल्याविराट कोहली ( RCB) - 6003*सुरेश रैना ( CSK) - 5369महेंद्रसिंग धोनी ( CSK )- 4409रोहित शर्मा ( MI ) - 4212एबी डिव्हिलियर्स ( RCB) - 3500+

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबादडेव्हिड वॉर्नरमहेंद्रसिंग धोनीविराट कोहलीरोहित शर्मासुरेश रैनाएबी डिव्हिलियर्सराजस्थान रॉयल्स