Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नर ( David Warner) ने सामन्याच्या तिसऱ्याच षटकात एका विक्रमाला गवसणी घातली. सनरायझर्स हैदराबाद ( SRH) कडून IPLमध्ये ३५०० धावा करण्याचा पराक्रम त्यानं नावावर केला.
पहिल्याच षटकात वॉर्नर माघारी परतला असता, परंतु त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिंमागे गेलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात झेपावण्याआधी टप्पा खाल्ला... वॉर्नर त्यानंतर सावध पवित्र्यात दिसला. दुसरीकडे जॉनी बेअरस्टो फटकेबाजी करत होता. पाचव्या षटकात कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर बेअरस्टोनं पुल शॉट मारला आणि डिप स्क्वेअरला उभ्या असलेल्या संजू सॅमसननं ( Sanju Samson) सुरेखरित्या तो टिपून RRला पहिले यश मिळवून दिले.
पाहा व्हिडीओ
- राजस्थान रॉयल्सचा संघः जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, रियान पराग, राहुल टेवाटिया, श्रेयस गोपाळ, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी
- यशस्वी जैस्वाल, महिपाल लोम्रोर, वरूण आरोन आणि अँड्य्रू टाय OUT, बेन स्टोक्स, रियान पराग, जयदेव उनाडकट व रॉबिन उथप्पा IN
- सनरायझर्स हैदराबादः डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियाम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, रशीद खान, टी नटराजन, खलील अहमद, संदीप शर्मा
- अब्दुल समद OUT, विजय शंकर IN
Web Title: SRH vs RR Latest News : Sanju Samson with a brilliant catch in his 100th outing in IPL; jonny bairstow out, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.