Pathum Nissanka Wanindu Hasaranga, SL vs PAK: श्रीलंकेचा विजयी चौकार! फायनलआधी पाकिस्तानची उडवली दाणादाण

फायनलच्या रंगीत तालमीत श्रीलंकेची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 10:59 PM2022-09-09T22:59:40+5:302022-09-09T23:00:17+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka beat Pakistan by 5 wickets Pathum Nissanka Wanindu Hasaranga shines Babar Azam fails again Asia Cup 2022 SL vs PAK  | Pathum Nissanka Wanindu Hasaranga, SL vs PAK: श्रीलंकेचा विजयी चौकार! फायनलआधी पाकिस्तानची उडवली दाणादाण

Pathum Nissanka Wanindu Hasaranga, SL vs PAK: श्रीलंकेचा विजयी चौकार! फायनलआधी पाकिस्तानची उडवली दाणादाण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pathum Nissanka Wanindu Hasaranga, SL vs PAK: Asia Cup 2022 Final ची रंगीत तालीम असलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर ५ गडी राखून सहज विजय मिळवला. अफगाणिस्तान विरूद्धच्या स्पर्धेचा पहिला सामना गमावल्यानंतर, श्रीलंकेने सलग चार सामने जिंकले आणि फायनलमध्ये खेळण्यासाठी आपली दावेदापी पेश केली. आधी वानिंदू हसरंगाची जादुई फिरकी आणि त्यानंतर सलामीवीर पाथूम निसांकाचे नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. मात्र, असे असले तरी श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात रविवारी (११ सप्टेंबर) होणारा अंतिम सामना जो जिंकेल, त्याला आशिया चषक उंचावण्याचा मान मिळणार आहे.

पाथूम निसांकाने मोडलं पाकिस्तानी गोलंदाजांचं कंबरडं!

श्रीलंकन गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर फलंदाजांनीही त्यांची भूमिका चोख वठवली. श्रीलंकेचा सलामीवीर पाथूम निसांका याने पाक गोलंदाजांची धुलाई करत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानी गोलंदाजांनी सुरूवात चांगली केली होती. लंकेचा दुसरा सलामीवीर कुसल मेंडिस आणि दनुष्का गुणतिलका या दोघेही शून्यावर बाद झाले. धनंजय डि सिल्वाही ९ धावा काढून बाद झाला. भानुका राजपक्षे (२ षटकारांसह २४ धावा) आणि दसून शनाका (२ षटकार १ चौकारासह २१ धावा) यांनी फटकेबाजी केली. पण हे बाद झाल्यानंतर निसांकाने हसरंगाच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. निसांकाने ५ चौकार आणि १ षटकार खेचत ४८ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या.

श्रीलंकन फिरकीपुढे पाकिस्तानी फलंदाजांनी टेकले गुडघे

तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवला. मोहम्मद रिझवान १४ तर बाबर आझम ३० धावा काढून माघारी गेले. त्यानंतरचे फलंदाज फार काळ मैदानात टिकू शकले नाहीत. फखर झमानने १३, इफ्तिखार अहमदने १३ धावा केल्या. बाकीच्यांना तर दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. खुशदिल शाहने ४, आसिफ अलीने ०, हसन अलीने ०, उस्मान कादीरने ३ आणि हॅरिस रौफने १ धाव केली. मोहम्मद नवाझने २ षटकार आणि १ चौकार खेचत थोडीशी झुंज दिली, पण १८ चेंडूत २६ धावा केल्यानंतर तो धावचीत झाला. त्यामुळे पाकिस्तानचा डाव १९.१ षटकांत १२१ धावांवर आटोपला. वानिंदू हसरंगाने सर्वाधिक ३, तिक्षणा-मदुशनने प्रत्येकी २ तर धनंजया-करूणरत्नेने १-१ बळी टिपला.

Web Title: Sri Lanka beat Pakistan by 5 wickets Pathum Nissanka Wanindu Hasaranga shines Babar Azam fails again Asia Cup 2022 SL vs PAK 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.