श्रीलंका-बोर्ड अध्यक्ष इलेव्हन लढत अनिर्णीत

कर्णधार संजू सॅमसनच्या १२८ धावांच्या खेळीच्या जोरावर  बोर्ड अध्यक्ष इलेव्हनने पाहुण्या श्रीलंका संघाविरुद्धचा दोन दिवसीय सराव  सामना आज अनिर्णीत राखला. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 03:30 AM2017-11-13T03:30:13+5:302017-11-13T03:31:12+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka-Board President XI match draws | श्रीलंका-बोर्ड अध्यक्ष इलेव्हन लढत अनिर्णीत

श्रीलंका-बोर्ड अध्यक्ष इलेव्हन लढत अनिर्णीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसराव सामना सॅमसनची शतकी खेळी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : कर्णधार संजू सॅमसनच्या १२८ धावांच्या खेळीच्या जोरावर  बोर्ड अध्यक्ष इलेव्हनने पाहुण्या श्रीलंका संघाविरुद्धचा दोन दिवसीय सराव  सामना आज अनिर्णीत राखला. 
श्रीलंकेने पहिला डाव ९ बाद ४११ धावसंख्येवर घोषित केला होता. प्र त्युत्तरात खेळताना बोर्ड अध्यक्ष इलेव्हनची दुसर्‍या दिवशी उपाहारापर्यंत २  बाद ३१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सॅमसनने संयमी खेळी करीत  संघाला ५ बाद २८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. ७५ षटकांच्या खेळानं तर उभय कर्णधारांनी लढत अनिर्णीत संपल्याचे मान्य केले. सॅमसनने १४३  चेंडूंना सामोरे जाताना १९ चौकार व १ षटकार लगावला. 
दुखापतग्रस्त असल्यामुळे नमन ओझाने या लढतीतून माघार घेतली होती.  त्यामुळे सामन्यापूर्वी सॅमसनकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते.  केरळच्या या युवा खेळाडूने श्रीलंकेच्या कसोटी आक्रमणाचा सर्मथपणे  सामना केला. सॅमसनने तीन उपयुक्त भागीदारी केल्या. त्याने सुरुवातीला  जीवनज्योत सिंग(३५) याच्यासोबत ६८ धावांची, रोहन प्रेम (३९)  याच्यासोबत ७१ धावांची आणि बावंका संदीप (३३) याच्यासोबत ८५  धावांची भागीदारी केली.  खेळपट्टीकडून गोलंदाजांना कुठल्याही प्रकारची  मदत मिळाली नाही. श्रीलंकेने १0 गोलंदाजांचा वापर केला त्यात नियमित  यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याचाही समावेश आहे. त्याने या लढतीत  अखेरचे षटक टाकले.  श्रीलंकेचे गोलंदाजी प्रशिक्षक रुमेश रत्नायके यांनी  मॅथ्यूज १६ नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणार्‍या कसोटी  सामन्यात गोलंदाजी करणार नसल्याचे स्पष्ट केले.  श्रीलंकेच्या  गोलंदाजांसाठी आजचा दिवस निराशाजनक ठरला. केवळ नव्या चेंडूने मारा  करणारा लाहिरू गामागे (२-४१) आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरला.  त्याने तन्मय अग्रवाल (१६) व अनमोलप्रीत सिंग (३) यांना लागोपाठ बाद  केले. 

संक्षिप्त धावफलक 
श्रीलंका - ४११/९ घोषित; भारत बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन - 
तन्मय अग्रवाल पायचीत थिरीमाने १६, जीवनज्योत सिंह झे. डिकेवेला गो.  परेरा ३५, आकाश भंडारी झे. शनाका गो. थिरीमाने ३, संजू सॅमसन झे.  डिकेवेला गो. समरविक्रमा १२८, रोहन प्रेम पायचीत डिसिल्वा ३९, बवान्का  संदीप नाबाद ३३, जलज सक्सेना नाबाद २0, गोलंदाजी- लहिरी थिरीमाने  ६-0-२२-२, दिलरुवान परेरा ९-१-२२-१, धनंजया डिसिल्वा ७-१- ३५-१, सदिरा समरविक्रमा ४-0-१३-१
 

Web Title: Sri Lanka-Board President XI match draws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.