World Cup 2023 : श्रीलंकेच्या संघाला दुखापतीचं ग्रहण; पहिल्या विजयासाठी दोन स्टार खेळाडू भारताकडे रवाना

वन डे विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या संघात दोन स्टार खेळाडूंची वर्णी लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 04:28 PM2023-10-19T16:28:13+5:302023-10-19T16:28:30+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka Cricket announce that Angelo Mathews and Dushmantha Chameera will join the team in India as traveling reserves ahead of Netherlands match which will be played in Lucknow on October 21st  | World Cup 2023 : श्रीलंकेच्या संघाला दुखापतीचं ग्रहण; पहिल्या विजयासाठी दोन स्टार खेळाडू भारताकडे रवाना

World Cup 2023 : श्रीलंकेच्या संघाला दुखापतीचं ग्रहण; पहिल्या विजयासाठी दोन स्टार खेळाडू भारताकडे रवाना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC odi World Cup 2023, SL vs NED | नवी दिल्ली : वन डे विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या संघात दोन स्टार खेळाडूंची वर्णी लागली आहे. खरं तर खेळाडूंच्या दुखापतीमुळे श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अँजेलो मॅथ्यूज आणि दुष्मंथा चमीरा यांचा राखीव खेळाडू म्हणून श्रीलंकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल अधिकृत घोषणा केली. 
 
श्रीलंकेचा नियमित कर्णधार दासुन शनाका दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. संघातील विद्यमान सदस्याला झालेल्या दुखापतीसारख्या आकस्मिक परिस्थितींना तोंड देण्यासाठी संघात राखीव खेळाडू म्हणून दोन अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 

आयसीसी वन डे विश्वचषकाच्या गुणतालिकेत आताच्या घडीला श्रीलंकेचा संघ तळाशी आहे. त्यांना आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. 

Web Title: Sri Lanka Cricket announce that Angelo Mathews and Dushmantha Chameera will join the team in India as traveling reserves ahead of Netherlands match which will be played in Lucknow on October 21st 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.