T20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षक सिल्वरवूड यांचा राजीनामा

Chris Silverwood resignation: वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे श्रीलंका क्रिकेट संघाने म्हटले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:24 PM2024-06-27T15:24:25+5:302024-06-27T15:31:15+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka Cricket announced Chris Silverwood resignation as head coach citing personal reasons after T20 World Cup 2024 | T20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षक सिल्वरवूड यांचा राजीनामा

T20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षक सिल्वरवूड यांचा राजीनामा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Chris Silverwood resignation, Sri Lanka Cricket head coach: सध्या सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात श्रीलंका क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी पदाचा राजीनामा दिला. २०२३च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची कामगिरी फारशी विशेष झाली नाही. त्यानंतर यंदाच्या टी२० विश्वचषकातही श्रीलंका संघ साखळी फेरीतच बाहेर पडला. त्यामुळे अखेर श्रीलंकन संघाच्या प्रशिक्षकांनी हा मोठा निर्णय घेतला.

श्रीलंकेच्या क्रिकेट संघासोबत सिल्व्हरवूड यांची कोचिंग कारकीर्द चमकदारपणे सुरू झाली होती. सिल्व्हरवूड यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने आशिया चषक २०२२ जिंकला होता. वनडे क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरले होते. सिल्व्हरवूडच्या प्रशिक्षकपदाच्या काळात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला T20 मालिकेत आणि बांगलादेशला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. पण सिल्वरवुड यांनी वैयक्तिक कारण सांगून श्रीलंका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर ख्रिस सिल्व्हरवूड यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, माझ्या कार्यकाळात मला खेळाडू, प्रशिक्षक, बॅकरूम स्टाफ आणि SLC च्या व्यवस्थापनाने सहकार्य केले. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. तुमच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही यश शक्य नव्हते. श्रीलंका क्रिकेटचा भाग असणे ही माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे आणि मी माझ्यासोबत अनेक गोड आठवणी घेऊन जाईन. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असणे म्हणजे आपल्या कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहणे होय. माझ्या कुटुंबाशी दीर्घ संभाषणानंतर आणि जड अंतःकरणाने, मला वाटते की आता घरी परतण्याची आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची वेळ आहे.

Web Title: Sri Lanka Cricket announced Chris Silverwood resignation as head coach citing personal reasons after T20 World Cup 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.