कोरोना व्हायरसचं संकट अजून दूर गेलेलं नाही आणि त्यामुळेच क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. पण, आता श्रीलंका क्रिकेट मंडळानं जुलै महिन्यात टीम इंडियानं दौरा करावा, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( बीसीसीआय) केली आहे. जून-जुलै मध्ये भारतीय संघ लंकन दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे या दौऱ्यावर अनिश्चिततेचं सावट आहे. पण, बीसीसीआयनं या दौऱ्याचा गांभीर्यानं विचार करावा, असं लंकन क्रिकेट मंडळानं म्हटलं आहे.
The Island या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार श्रीलंका क्रिकेट मंडळ जुलैच्या अखेरच्या टप्प्यात भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळण्यास उत्सुक आहेत. त्यांनी त्या संदर्भात बीसीसीआयला मेलही पाठवला आहे आणि त्यांना बीसीसीआयच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. या मेलमध्ये त्यांनी या मालिकेचा गांभीर्यानं विचार करावा असे म्हटले आहे.
''या दौऱ्यावर खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमांचं काटेकोर पालन करायला हवं आणि हे सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येतील,''अशी माहिती लंकन मंडळाच्या अधिकाऱ्यानं दिली. पण, जोपर्यंत सरकारकडून स्पष्ट सूचना मिळत नाही, तोपर्यंत संघ दौऱ्यावर जाणार नाही, हे बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलं आहे. यापूर्वी इंग्लंडनं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लंकन दौरा सोडला होता. भारतानेही हा दौरा न केल्यास लंकन मंडळाला मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
रवी शास्त्रींची रोखठोक भूमिका; आधी आयपीएल, स्थानिक क्रिकेट सुरू व्हायला हवं, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर!
IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत
Video : सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा अन् हरभजन सिंग यांना युवराज सिंगचं चॅलेंज
Video : दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या घरी अचानक आले दिल्ली पोलीस अन्...
शाहिद आफ्रिदीचं जलद शतक अन् सचिन तेंडुलकरची बॅट; काय आहे नेमकं कनेक्शन?
भावा, हा तू आहेस का? विराट कोहलीचा डुप्लिकेट पाहून पाकिस्तानी गोलंदाज कन्फ्यूज
Web Title: Sri Lanka Cricket requests BCCI to consider Sri Lanka tour in July svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.