Asia Cup 2022 : श्रीलंकेकडेच यजमानपद, आशिया चषक स्पर्धेबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; जाणून घ्या स्पर्धा केव्हा व कुठे होणार

Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेबाबत बुधवारी मोठी अपडेट्स समोर आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 10:33 PM2022-07-27T22:33:14+5:302022-07-27T22:33:39+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka Cricket to host Asia Cup 2022 in UAE, It'll start from 27th August and the Final will be played on 11th September | Asia Cup 2022 : श्रीलंकेकडेच यजमानपद, आशिया चषक स्पर्धेबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; जाणून घ्या स्पर्धा केव्हा व कुठे होणार

Asia Cup 2022 : श्रीलंकेकडेच यजमानपद, आशिया चषक स्पर्धेबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; जाणून घ्या स्पर्धा केव्हा व कुठे होणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेबाबत बुधवारी मोठी अपडेट्स समोर आले आहेत. २१ जुलैला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याबाबत आज आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जय शाह ( Jay Shah) यांनी मोठी घोषणा केली. श्रीलंकेत सुरू असलेल्या राजकिय परिस्थितीमुळे आशिया चषक २०२२ हे तिथे होणार नाही, हे निश्चित होते. त्यासाठी बांगलादेश, UAE आणि भारत यांचेही नाव चर्चेत होते. पण, आज अखेर त्यावर पडदा पडला. ही स्पर्धा श्रीलंकेच्याच यजमानपदाखाली UAE येथे होणार असल्याची घोषणा, जय शाह यांनी केली.

१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आमि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

जय शाह म्हणाले, ''श्रीलंकेतच ही स्पर्धा यशस्वी खेळवण्यात यावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, परंतु सद्य परिस्थिती लक्षात घेता ही स्पर्धा हलवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यूएईत ही स्पर्धा होणार आहे, परंतु याचे यजमानपद हे श्रीलंकेकडेच राहणार आहे. आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने यंदाची आशिया चषक स्पर्धा ही आशियाई संघांच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. श्रीलंकन क्रिकेट व यूएईल क्रिकेट यांचे मी आभार मानतो.''

ही स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात किमान दोन-तीन सामने होतील अशी अपेक्षा आहे. क्रिकेट रसिकांसाठी ही पर्वणीच ठरेल. या दोन संघाशिवाय अफगाणिस्तान, श्रीलंका व बांगलादेश हेही खेळणार आहेत.

Web Title: Sri Lanka Cricket to host Asia Cup 2022 in UAE, It'll start from 27th August and the Final will be played on 11th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.