Sri Lanka T20I squad for India tour 2022: ज्याच्यावरून चेन्नई सुपर किंग्सवर बंदीची मागणी झाली, त्या गोलंदाजाला श्रीलंकेनं ट्वेंटी-२० संघात संधी दिली 

Sri Lanka T20I squad for India tour 2022 -  भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची आताच घोषणा करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 03:35 PM2022-02-21T15:35:34+5:302022-02-21T15:42:11+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka Cricket’s Selection Committee selected the T20I squad to take part in the upcoming 03 match T20I series with India | Sri Lanka T20I squad for India tour 2022: ज्याच्यावरून चेन्नई सुपर किंग्सवर बंदीची मागणी झाली, त्या गोलंदाजाला श्रीलंकेनं ट्वेंटी-२० संघात संधी दिली 

Sri Lanka T20I squad for India tour 2022: ज्याच्यावरून चेन्नई सुपर किंग्सवर बंदीची मागणी झाली, त्या गोलंदाजाला श्रीलंकेनं ट्वेंटी-२० संघात संधी दिली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sri Lanka T20I squad for India tour 2022 -  भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची आताच घोषणा करण्यात आली. २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी १८ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. दासून शनाका याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असेल, तर चरिथ असालांका हा उपकर्णधार असेल. IPL 2022 ऑक्शनमध्ये १०.७५ कोटी कमावणाऱ्या वनिंदू हसरंगा याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत, तर चेन्नई सुपर किंग्सने  ताफ्यात घेतलेल्या महीष तिक्ष्णा यालाही संधी देण्यात आली आहे. तिक्ष्णाच्या समावेशामुळे तामिळी जनता भडकली होती आणि त्यांनी चेन्नई सुपर किंग्सवर बंदीची मागणी केली हो     

श्रीलंकेच्या संघाला नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत १-४ असा दारूण पराभव पत्करावा लागला आहे. श्रीलंकेने पाचव्या सामन्यात ५ विकेट्स राखून सामना जिंकून व्हाईट वॉश टाळला होता. मालिकेचा निकाल श्रीलंकेच्या विरोधात लागला असला तरी त्यांच्या काही खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. कुसल मेंडिसने ५०च्या सरासरीने १०० धावा केल्या. निसांकाने सर्वाधिक १८४ धाववा केल्या. तिक्ष्णाने पाच विकेट्, दुश्मंथाने ७ विकेट्स घेतल्या. वनिंदू हसरंगानेही दोन सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या.  


श्रीलंकेचा ट्वेंटी-२० संघ - दासून शनाका, चरिथ असालांका, पथुम निसांका, कुशल मेंडिस, दिनेश चंडीमल, धनुष्का गुणातिलका, कामिल मिशारा, जनथ लियानागे, वनिंदू हसरंगा, चामिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दुश्मंथा चमीरा, बिनुरा फर्नाण्डो, शिरन फर्नाण्डो, महीश तिक्ष्णा, जॅफरी वेंडरसे, प्रवीन जयाविक्रमा, आशियान डेनियल. ( T20I Squad - Dasun Shanaka – Captain,  Pathum Nissanka, Kusal Mendis, Charith Asalanka – Vice-Captain, Dinesh Chandimal, Danushka Gunathilaka, Kamil Mishara, Janith Liyanage,  Wanindu Hasaranga, Chamika Karunaratne, Dushmantha Chameera, Lahiru Kumara, Binura Fernando, Shiran Fernando, Maheesh Theekshana, Jeffrey Vandersay, Praveen Jayawickrama,  Ashian Daniel – Subjected to Ministerial approval) 
 

तिक्ष्णाला का होतोय विरोध?
चेन्नई सुपर किंग्सने तिक्ष्णाला आपल्या संघात घेतल्याने चेन्नईसह तामिळनाडूचे फॅन्स नाराज झाले आहेत. त्यांनी चेन्नई सुपर किंग्सवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. तिक्ष्णा हा सिंहली वंशातील आहे आणि श्रीलंकेत सिंहलींनकडून तामिळ वंशाच्या लोकांवर अत्याचार केले गेले होते. त्यामुळेच श्रीलंकेत LTTE सारखी संघटना जन्माला आली. तामिळ वंशाच्या  लोकांवर अत्याचार होत असल्यामुळे तामिळनाडूत सिंहली वंशाच्या लोकांवर विरोध केला जातोय.. 

भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान

भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, रवि अश्विन (फिटनेस पाहून निर्णय घेणार)

सुधारित वेळापत्रक
पहिली ट्वेंटी-२० - २४ फेब्रुवारी, लखनौ
दुसरी ट्वेंटी-२० -  २६ फेब्रुवारी, धर्मशाला
तिसरी ट्वेंटी-२० - २७ फेब्रुवारी, धर्मशाला
पहिली कसोटी - ४ ते ८ मार्च, मोहाली
दुसरी कसोटी - १२ ते १६ मार्च ( डे नाईट),  बंगळुरू 

Web Title: Sri Lanka Cricket’s Selection Committee selected the T20I squad to take part in the upcoming 03 match T20I series with India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.