Sri Lanka Economic Crisis : CSKचा सामना करण्यापूर्वी RCBच्या वनिंदू हसरंगासह श्रीलंकेच्या खेळाडूंना IPL 2022 सोडण्याची विनंती, जाणून घ्या कारण 

Sri Lanka Economic Crisis : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा 'दक्षिण डर्बी' चा सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:41 PM2022-04-12T15:41:49+5:302022-04-12T15:42:32+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka Economic Crisis : Arjuna Ranatunga urges SL players to leave IPL and stand in support of their country | Sri Lanka Economic Crisis : CSKचा सामना करण्यापूर्वी RCBच्या वनिंदू हसरंगासह श्रीलंकेच्या खेळाडूंना IPL 2022 सोडण्याची विनंती, जाणून घ्या कारण 

Sri Lanka Economic Crisis : CSKचा सामना करण्यापूर्वी RCBच्या वनिंदू हसरंगासह श्रीलंकेच्या खेळाडूंना IPL 2022 सोडण्याची विनंती, जाणून घ्या कारण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sri Lanka Economic Crisis : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा 'दक्षिण डर्बी' चा सामना रंगणार आहे. RCBचा स्टार फिरकीपटू वनिंदू हसरंगा चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याने चार सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या आहेत. अशातच आज श्रीलंकेच्या खेळाडूंना आयपीएल २०२२ सोडून मायदेशात परतण्याची विनंती माजी क्रिकेटपटू व मंत्री अर्जुना रणतुंगा ( Arjuna Ranatunga) यांनी केली आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था ढासळली आहे आणि तेथे निदर्शनं सुरू आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी IPL 2022 सोडून देशवासियांसोबत उभं रहावं, अशी विनंती रणतुंगा यांनी केली आहे.

''काही खेळाडू देशातील परिस्थिती विसरून आयपीएलच्या झगमगाटात खेळत आहेत आणि ते त्यांच्या देशाबद्दल फार काही बोलत नाहीत. दुर्दैवाने लोकं सरकारविरोधात बोलायला घाबरत आहेत. हे खेळाडूही सरकारकडून चावलण्यात आलेल्या क्रिकेट बोर्डासाठी काम करता आणि ते त्यांची नोकरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आता या युवा खेळाडूंनी पुढे येऊन निदर्शनकर्त्यांना पाठिंबा द्यायला हवा,''असे रणतुंगा म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की,''जेव्हा काही चुकीचं घडतं, तेव्हा त्याच्याविरोधात आवाज उठवायला हवा आणि मुक्तपणे बोलायला हवे. अशावेळी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवायला हवा. लोकं मला विचारतात तुम्ही निर्दर्शनकर्त्यांमध्ये का दिसत नाही.. मी त्यांना सांगतो की मी १९ वर्ष राजकारणात आहे आणि हा राजकीय मुद्दा नाही. या आंदोलनात कोणताचा राजकिय पक्ष नाही, ही लोकांची ताकद आहे.''


श्रीलंकेचा खेळाडू वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षा यांनी आधीच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

Web Title: Sri Lanka Economic Crisis : Arjuna Ranatunga urges SL players to leave IPL and stand in support of their country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.