IND vs SL Series rescheduled : श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोना व्हायरसनं शिरकाव केल्यानंतर भारत-श्रीलंका यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शनिवारी या वृत्ताला दुजोरा देताना व्या तारखा जाहीर केल्या. श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर आणि डाटा विश्लेषक जीटी निरोशन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्यानंतर या मालिकेच्या वेळापत्रकाच्या बदलाच्या चर्चा सुरू झाल्या. ''भारत-श्रीलंका यांच्यातली मालिका १८ जुलैपासून सुरू होणार आहे,''अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ANI ला दिली.
IND vs SL : धक्कादायक; कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या ग्रँड फ्लॉवर यांनी लस घेण्यास दिला होता नकार!
शिखऱ धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येथे दाखल झाला आहे. राहुल द्रविड या संघाला मार्गदर्शन करणार आहे. १३ जुलैपासून वन डे मालिकेला सुरुवात होणार होती. पण, श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला. श्रीलंकेचा संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरून परतला अन् इंग्लंडचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर लंकन खेळाडूंचीही चाचणी करण्यात आली.
भारतीय संघ - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया
नेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग
जाणून घ्या नव्या तारखा
- वन डे मालिका - १८, २० व २३ जुलै
- ट्वेंटी-२० मालिका - २५ , २७ व २९ जुलै