Join us  

T20 World Cup 2022: लाजिरवाणा पराभव श्रीलंकेला विश्वचषकातून बाहेर करणार? जाणून घ्या समीकरण

विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा ५५ धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 4:12 PM

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर आजपासून टी-२० विश्वचषकाचे बिगुल वाजले आहे. सुपर-१२ च्या पहिल्या सामन्यात श्रीलंका आणि नामिबिया हे संघ आमनेसामने होते. आशियाई चॅम्पियन श्रीलंकेला पराभूत करून नवख्या नामिबियाने इतिहास रचला आहे. या विजयासह नामिबियाच्या संघाने सुपर-१२ च्या फेरीकडे कूच केली असून संघाच्या आजच्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आजच्या सामन्याचा धक्कादायक निकाल पाहून सर्वांनाच धक्का बसला. या सामन्यात आशियाई चॅम्पियन असलेल्या श्रीलंकेवर नामिबियाच्या नवख्या संघाने ५५ धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना नामिबियाच्या संघाने २० षटकांत ७ बाद १६३ धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सर्वबाद केवळ १०८ धावा करू शकला. त्यामुळे नवख्या नामिबियाच्या संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात ५५ धावांनी मोठा विजय मिळवून इतिहास रचला. अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषकात देखील श्रीलंकेचा पहिल्या सामन्यात पराभव झाला होता मात्र संघाने नंतर जोरदार कमबॅक करून ट्रॉफीवर कब्जा केला होता. मात्र आज झालेल्या मोठ्या पराभवामुळे त्याचा नेट रनरेटच ढासळला नाही तर सुपर-१२ ची फेरी गाठणे देखील कठीण झाले आहे. 

विश्वचषकातून बाहेर होऊ शकते श्रीलंकासुपर-१२ च्या लढतीत श्रीलंकेच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. फेरी-१ मध्ये दोन गट असून दोन्ही गटात प्रत्येकी चार संघ ठेवण्यात आले आहेत. एकूण आठ संघांपैकी दोन्ही गटातील अव्वल दोन संघ पुढे जाणार आहेत. श्रीलंकेच्या गटात त्याच्यांशिवाय नामिबिया, नेदरलँड आणि यूएईचे संघ आहेत. या सर्व संघामध्ये मोठी उलटफेर करण्याची क्षमता आहे. खरं तर श्रीलंकेसाठी आगामी दोन्ही सामने 'करा किंवा मरा' असे असणार आहेत. एका पराभवामुळे देखील श्रीलंकेला विश्वचषकातून बाहेर व्हावे लागू शकते. 

श्रीलंकेसाठी 'करा किंवा मरा'ची स्थितीश्रीलंकेच्या संघाला आता १८ ऑक्टोबरला यूएईसोबत खेळायचे आहे. यानंतर २० ऑक्टोबर रोजी त्यांचा सामना नेदरलँडशी होईल. रविवारी म्हणजेच आज दुसरा सामना नेदरलँड आणि यूएई यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यातील विजयी संघ श्रीलंकेला पराभूत करूनच दोन विजय मिळवेल. त्यामुळे आता श्रीलंकेला आगामी दोन्ही सामन्यात विजय मिळवून सुपर-१२ मध्ये प्रवेश करावा लागेल. लक्षणीय बाब म्हणजे दर संघाने एकही सामना गमावला तर त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल, परंतु त्यासाठी देखील नेटरनरेट चांगला असणे गरजेचे आहे. 

टी-२० विश्वचषकात सुपर-१२ फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये सामने खेळवले जात आहे. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-१२ सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील. 

पहिला राउंड अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.

ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे. 

सुपर-१२ फेरीगट १ - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.

गट २ - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२श्रीलंकाआॅस्ट्रेलिया
Open in App