श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदनंदा अलूठगमगे यांनी 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना फिक्स्ड असल्याचा दावा केला. भारत आणि श्रीलंका यांच्यात तो सामना खेळला गेला आणि भारतानं 6 विकेट्स राखून सामना जिंकला. भारतानं 28 वर्षानंतर वन डे वर्ल्ड कपवर पुन्हा नाव कोरले होते. पण, या सामन्यावर अनेकदा फिक्सिंगचे आरोप झाले आणि आता क्रीडा मंत्र्यांच्या दाव्यानं पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. अलूठगमगे यांच्या आरोपांनंतर श्रीलंका सरकारनं आरोपांची गंभीर दखल घेतली असून श्रीलंका क्रीडा मंत्रालयानं या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार माजी खेळाडूंची कसून चौकशीही करण्यात आली, परंतु शुक्रवारी श्रीलंका पोलिसांनी या प्रकरणाबाबत मोठा निर्णय घेतला.
अलुठगमागे हे 2011मध्ये श्रीलंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यांनी सांगितले की,''मी या वक्तव्याची संपूर्ण जबाबदारी घेतो. फक्त मला याबाबत अधिक खुलासा करायचा नाही, कारण मला देशाची इभ्रत महत्त्वाची आहे. 2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स होती. यात कोणता खेळाडू सहभागी नव्हता, परंतु एक गट होता जो या कटात सहभागी होता.'' त्यांनी अप्रत्यक्षपणे कोणत्यातरी राजकीय पक्षाकडे बोट दाखवले. त्यानंतर सध्याचे क्रीडा मंत्री डल्लास अलहप्पेरूमा यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
या प्रकरणी श्रीलंकन पोलिसांनी माजी मुख्य निवड समिती प्रमुख अरविंद डी'सिल्वा, माजी कर्णधार कुमार संगकारा, माहेला जयवर्धने आणि सलामीवीर उपूल थरंगा यांची चौकशी केली. पण, पुराव्या अभावी अखेरीस श्रीलंकन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की,''चौकशीत खेळाडूंनी दिलेल्या स्पष्टीकरणावर आम्ही समाधानी आहोत. अंतिम सामन्यात संघात बदल का केले, यासाठी त्यांच्याकडे योग्य स्पष्टीकरण होतं. त्यामुळे यात कोणतीही चुकीची गोष्ट झाल्याचे आम्हाला आढळले नाही. त्यामुळे हा तपास इथेच थांबवत आहोत.'' अंतिम सामन्यात श्रीलंकन संघानं चार बदल केले.
बाबो: 89 वर्षांचे वडील अन् 65 वर्षांची बहीण; फॉर्म्युला वनच्या माजी बॉसला पुत्ररत्न!
सुशांत सिंग राजपूतचा मित्र अन् दिग्गज बॉक्सरवर कोसळला दुःखाचा डोंगर!
Fact check: चीनला विरोध करणाऱ्या हाँगकाँगच्या आंदोलकांमध्ये खरंच दिसले का किम जोंग-उन?
ENGvsWI : इंग्लंड संघावर कोरोना संकट? खेळाडूची प्रकृती अचानक बिघडली, झाला सेल्फ आयसोलेट
इरफान पठाणला 'पुढील हाफिज सईद' म्हणणाऱ्या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा म्हणते...
पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप; वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पत्नीला लपवलं होतं कपाटात