T20 World Cup Sri Lanka qualified into the Super 12 : श्रीलंका संघानं Round 1 मधील अ गटातील दोन्ही सामने जिंकून Super 12 मधील स्थान पक्कं केलं. श्रीलंका संघानं बुधवारी आयर्लंडवर ७० धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात मोठा गाजावाजा करून संघात घेतलेल्या वनिंदू हसरंगाला ( Wanindu Hasaranga ) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) बाकावर बसवून ठेवले. त्याच हसरंगाच्या ( ७१ धावा व १ विकेट) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेनं आयर्लंडवर ७० धावांनी विजय मिळवला आणि Super 12 मध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं ३ फलंदाज ८ धावांवर गमावले होते. सलामीवीर पथूम निसंका व वनिंदू हसरंगा यांनी श्रीलंकेचा डाव सावरला अन् आयर्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. हसरंगा ४७ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ७१ धावांवर माघारी परतला. त्यापाठोपाठ निसंकाही ४७ चेंडूंत ६ चौकार १ षटकारासह ६१ धावांवर बाद झाला. १३१ धावा असताना वनिंदूची विकेट पडली अन् पुन्हा श्रीलंकेची गाडी घसरली व त्यांना २० षटकांत ७ बाद १७१ धावा करता आल्या. आयर्लंडच्या जोश लिटलनं २३ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात आयर्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कर्णधार अँडी बाल्बर्नी ( ४१) व कर्टीस कॅम्फेर ( २४) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. महिश थिक्साना ( ३-१७), चमिका करुणारत्ने ( २-२७) व लहिरु कुमार ( २-२२) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. वनिंदूनं ४ षटकांत १२ धावा देताना १ विकेट घेतली. आयर्लंडचा संपूर्ण संघ १८.३ षटकांत १०१ धावांत माघारी परतला.
Web Title: Sri Lanka qualified into the Super 12 of the T20 World Cup 2021; 71 runs & 1 wickets all-round performance from Wanindu Hasaranga
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.