Join us  

 लंकेत विराटसेना अजिंक्य! कसोटी, वनडेपाठोपाठ ट्वेंटी-२० मालिकाही जिंकली

कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व राखल्यानंतर आज झालेल्या ट्वेंटी-२० लढतीतही भारतीय संघाचाच बोलबाला राहिला. कर्णधार विराट कोहलीने केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने एकमेव ट्वेंटी-२० लढतीत श्रीलंकेवर सात गडी राखून मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 9:14 PM

Open in App

कोलंबो, दि. ६ -  गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर कर्णधार विराट कोहली (८२) आणि मनीष पांडे (५१*) यांनी दिलेल्या अर्धशतकी तडाख्याच्या जोरावर भारताने एकमेव टी-२० सामन्यात यजमान श्रीलंकेचा ७ विकेटने धुव्वा उडवला. यासह भारताने कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर एकमेव टी-२० सामन्यातही दबदबा राखताना लंका दौºयात ९-० अशी विजयी कामगिरी केली. लंकेने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करताना भारताने १९.२ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात बाजी मारली. टीम इंडियाने या दौºयात श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी, ५ वन-डे व १ टी-२० हे सर्व सामने जिंकून ९-०ने टूरवॉश दिला.प्र्रेमदासा स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली खरी, परंतु रोहित शर्मा (९) आणि लोकेश राहुल (२४) हे सलामीवीर लवकर बाद झाल्याने सहाव्या षटकात भारताची २ बाद ४२ अशी घसरगुंडी उडाली; पण कर्णधार कोहलीने येथून सगळी सूत्रे आपल्याकडे घेताना मनीष पांडेसह तिसºया विकेटसाठी ११९ धावांची निर्णयाक भागीदारी केली. भारताला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता असताना कोहली बाद झाला. यानंतर पांडे आणि धोनी यांनी भारताच्या विजयाची औपचारिकता पार पाडली. कोहलीने ५४ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ८२ धावा केल्या; तसेच पांडेने अखेरपर्यंत टिकून राहताना ३६ चेंडंूत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ५१ धावांची विजयी खेळी केली. इसुरू उदाना, लसिथ मलिंगा आणि सीक्कुगे प्रसन्ना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून कोहलीने यजमानांना प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. तुफानी सुरुवात केल्यानंतर भारताने मोक्याच्या वेळी धक्के दिल्याने यजमान श्रीलंकेने २० षटकांत ७ बाद १७० धावांची मजल मारली. दिलशान मुनावीराने (५३) आक्रमक अर्धशतक झळकावत लंकेला आव्हानात्मक मजल मारून दिली.निरोशन डिकवेला, कर्णधार उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज आणि थिसारा परेरा हे प्रमुख फलंदाज स्वस्तात परतले. परंतु, मुनावीराने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याने अशन प्रियांजनसह संघाला सावरले. अर्धशतक झळकावल्यानंतर दिलशान कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २९ चेंडंूत ५ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावा कुटल्या. यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद झाले; परंतु प्रियांजनने अखेरपर्यंत नाबाद राहत ४० चेंडंूत १ चौकार व २ षटकारांसह महत्त्वपूर्ण ४१ धावा केल्या. युझवेंद्र चहलने ४३ धावांत ३, तर कुलदीप यादवने २० धावांत २ बळी घेतले. भुवनेश्वर आणि जसप्रीत यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :श्रीलंका : निरोशन डिकवेला त्रि. गो. बुमराह १७, उपुल थरंगा त्रि. गो. भुवनेश्वर ५, दिलशान मुनावीरा त्रि. गो. कुलदीप ५३, अँजेलो मॅथ्यूज यष्टीचीत धोनी गो. चहल ७, अशन प्रियांजन नाबाद ४०, थिसारा परेरा त्रि. गो. चहल ११, दासुन शनाका पायचीत गो. चहल ०, सीक्कुगे प्रसन्ना झे. विराट गो. कुलदीप ११, इसुरू उदाना नाबाद १९. अवांतर - ७ धावा. एकूण २० षटकांत ७ बाद १७० धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-३६-१; जसप्रीत बुमराह ४-०-३८-१; युझवेंद्र चहल ४-०-४३-३; अक्षर पटेल ४-०-२९-०; कुलदीप यादव ४-०-२०-२.भारत : रोहित शर्मा झे. परेरा गो. मलिंगा ९, लोकेश राहुल झे. शनाका गो. प्रसन्ना २४, विराट कोहली झे. शनाका गो. उदाना ८२, मनीष पांडे नाबाद ५१, महेंद्रसिंह धोनी नाबाद १. अवांतर - ७. एकूण : १९.२ षटकांत ३ बाद १७४ धावा. गोलंदाजी : अँजेलो मॅथ्यूज ३-०-३३-०; इसुरू उदाना ४-०-३६-१; लसिथ मलिंगा ४-०-३१-१; सीक्कुगे प्रसन्ना ३-०-२५-१; अकिला धनंजय ४-०-२८-०; थिसारा परेरा १.२-०-२०-०.नंबर गेम...विराट कोहली ५० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारा चौथा भारतीय ठरला.श्रीलंकेने अखेरच्या १० षटकांमध्ये केवळ ८० धावा काढल्या. पहिल्या १० षटकांत लंकेने ३ बाद ९० धावा केल्या होत्या.यंदाच्या वर्षी श्रीलंकेने पॉवरप्लेमध्ये ९.०७ च्या सरासरीने धावा फटकावल्या. केवळ आॅस्टेÑलिया आणि बांगलादेश यांनी याहून जास्त सरासरीने पॉवरप्लेमध्ये धावा काढल्या आहेत.प्रेमदासा स्टेडियमवर लंकेचा टी-२० चा रेकॉर्ड ३-११ असा झाला आहे. तसेच, भारताची या स्टेडियमवरील कामगिरी ६-१ अशी झाली आहे.श्रीलंका दौºयात भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही.विराट कोहलीचे टी-२० मधील १७वे अर्धशतक.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ