IND vs SL: भारताविरूद्धच्या मालिकेसाठी 'आशियाई किंग्ज' सज्ज; दासुन शनाकाच्या नेतृत्वातील संघ झाला जाहीर 

Sri Lanka squad for India tour 2023: 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिका खेळवली जाणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 05:13 PM2022-12-28T17:13:45+5:302022-12-28T17:14:53+5:30

whatsapp join usJoin us
 Sri Lanka squad for the 3 T20 and 3 ODI series against India has been announced with Dasun Shanaka as the captain  | IND vs SL: भारताविरूद्धच्या मालिकेसाठी 'आशियाई किंग्ज' सज्ज; दासुन शनाकाच्या नेतृत्वातील संघ झाला जाहीर 

IND vs SL: भारताविरूद्धच्या मालिकेसाठी 'आशियाई किंग्ज' सज्ज; दासुन शनाकाच्या नेतृत्वातील संघ झाला जाहीर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारताविरूद्धच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर झाला आहे. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून इथे 3 ट्वेंटी-20 आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. दासुन शनाकाच्या नेतृत्वात आशियाई किंग्ज रोहित आणि हार्दिक सेनेला भिडणार आहेत. खरं तर श्रीलंकेच्या वन डे संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा कुसल मेंडिसकडे सोपवण्यात आली आहे, तर ट्वेंटी-20 संघाचे उपकर्णधारपद वानिदु हसरंगा सांभाळणार आहे. 

भारताविरूद्धच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ - 
दासुन शनाका (कर्णधार), पाठुम निस्संका, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस (वन डे साठी उपकर्णधार), भानुका राजपक्षे (फक्त ट्वेंटी-20साठी), चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा (ट्वेंटी-20 साठी उपकर्णधार), अशेन बंधारा, महेश थेक्षाना, जेफ्री वँडरसे (फक्त वन डे साठी), चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसून रजिथा, नुवानिडू फर्नांडो (फक्त वन डे साठी), दुनिथ वेललागे, प्रमोद मधुशन, लाहिरु कुमार, नुवान तुषारा (फक्त ट्वेंटी-20 साठी). 

 

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा ट्वेंटी-20 संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक 

  • 3 जानेवारी, मंगळवार - पहिला ट्वेंटी-20 सामना, मुंबई
  • 5 जानेवारी, गुरूवार - दुसरा ट्वेंटी-20 सामना, पुणे 
  • 7 जानेवारी, शनिवार - तिसरा ट्वेंटी-20 सामना, राजकोट 
  • 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
  • 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
  • 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title:  Sri Lanka squad for the 3 T20 and 3 ODI series against India has been announced with Dasun Shanaka as the captain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.