कोलंबो : भारताच्या दौ-यावर येणारा १५ सदस्यीय श्रीलंका संघ रविवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून जाहीर करण्यात आला. माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याचे संघात पुनरागमन झाले असून, फलंदाज कुशल मेंडिस आणि कुशल सिल्वा यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. अँजेलो मॅथ्यूज पाकिस्तान दौºयात दुखापतीमुळे जाऊ शकला नव्हता. कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांच्या निवृत्तीनंतर २०१५ मध्ये कसोटी पर्दापण करणाºया २२ वर्षीय मेंडिसकडे उत्कृष्ट फलंदाजाच्या रूपात पाहिले जात होते. श्रीलंका संघ भारतात ३ कसोटी व प्रत्येकी ३ वनडे व टी-२० सामने खेळेल. श्रीलंका संघ बुधवारी भारतात दाखल होईल.
संघ पुढीलप्रमाणे
दिनेश चांदिमल (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, धनंजय डीसिल्वा, सादिरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरिमाने, रंगना हेराथ, सुरंगा लकमल, दिलरूवान परेरा, लाहिरू गामागे, लक्षण संदाकन, विश्व फर्नांडो, दासुन शनाका, निरोशन डिकवेला आणि रोशन सिल्वा.
Web Title: Sri Lanka team for India tour
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.