कोलकाता : दिनेश चांदीमल याच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ भारतात सहा आठवड्यांच्या दौºयासाठी आज येथे दाखल झाला. दौºयाची सुरुवात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. पहिला सामना १६ नोव्हेंबरपासून येथे होणार आहे.
श्रीलंकेचा संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध तीन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२0 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंकेचा १५ सदस्यीय संघ उद्यापासून सराव करेल. त्यानंतर तो बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध दोनदिवसीय सराव सामना खेळणार आहे. हा सामना ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. स्थानिक व्यवस्थापक म्हणाले, ‘आज ते विश्रांती करतील आणि उद्यापासून सराव करतील.’ श्रीलंकेने याआधी भारतात २००९ मध्ये कसोटी सामने खेळले होते. ही मालिका भारताने २-० ने जिंकली होती. भारताने या वर्षी श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर तीन कसोटी सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली होती आणि त्यानंतर वनडे आणि एक टी -२० सामन्यातही त्यांचा सफाया केला होता. तथापि, श्रीलंकन संघाने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली आणि यूएईमधील कसोटी मालिका २-० ने जिंकली; परंतु त्यानंतर ते वनडे मालिका ०-५ ने गमावून बसले.
श्रीलंकेचा संघ : दिनेश चांदीमल (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, लाहिरू थिरिमाने (उपकर्णधार), निरोशन डिकवेला (यष्टिरक्षक), दिलरुवान परेरा, रंगना हेराथ, सुरंगा लखमल, लाहिरू गमागे, धनंजय डिसिल्वा, अँजोलो मॅथ्यूज, लक्षण संदाकन, विश्व फर्नांडो, दासुन शनाका, रोशन सिल्वा.
Web Title: Sri Lanka team in Kolkata, on 16 November, the first match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.