कोलंबो : श्रीलंका दौ-यातील यश शानदार ठरले. या यशाचे सर्व श्रेय सांघिक कामगिरीला जाते, असे सांगतानाच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ही कामगिरी विशेष असल्याचेही म्हटले. बुधवारी झालेल्या टी-२० सामन्यात बाजी मारून भारताने ३ सामन्यांची कसोटी मालिका, ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकतानाच लंका दौºयात एकही सामना गमावला नाही.बुधवारी झालेल्या दौºयातील एकमेव टी-२० सामना जिंकल्यानंतर कोहली म्हणाला, ‘‘हे यश खूप विशेष आहे. दौºयातील प्रत्येक मालिकेत क्लीन स्वीप देण्याची कामगिरी यापूर्वी कधीही झाली नव्हती. या कामगिरीचे सर्व श्रेय खेळाडूंना जाते. आमची बेंच स्टेÑंथ मजबूत असून या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. या दौºयात आम्ही काही प्रयोगही केले आणि ते यशस्वी ठरले.’’कोहलीने एकदिवसीय मालिकेसह टी-२० सामन्यांतही चांगली कामगिरी केली. याबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘‘माझ्या कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास मी कायम माझ्या मजबूत बाजूंकडे लक्ष देतो आणि नेहमी पारंपरिक फटके खेळण्यावर भर देतो. खेळाच्या प्रत्येक प्रकारानुसार मी स्वत:चा खेळ बदलण्यावर भर देतो. ’’ (वृत्तसंस्था)कोहलीकडून गोलंदाजांना स्वातंत्र्य : कुलदीपकोलंबो : कर्णधार विराट कोहली हा गोलंदाजांना भरपूर सहकार्य करतोच; शिवाय भरपूर स्वातंत्र्य देत असल्याची भावना लेग स्पिनर कुलदीप यादव याने व्यक्त केली. मैदानावर गोलंदाजांना ज्या गोष्टींची गरज असते, त्या सर्व बाबींची पूर्तता विराटकडून होत असल्याचे सांगून कुलदीप पुढे म्हणाला, ‘‘तुम्हाला कशी फिल्डिंग हवी, हे तो स्वत: विचारतो. मला कसोटी, वन डे आणि टी-२०तही त्याची साथ लाभली. संघात एकोपा निर्माण करणाºया या कर्णधारावर मी खूष आहे. मैदानावरील कोहलीची समर्पण वृत्ती इतरांसाठी प्रेरणादायी ठरावी.’’ ‘विराट फलंदाजी आणि फिल्डिंग या दोन्ही आघाड्यांवर नेतृत्व करीत असून, फिल्डिंगदरम्यान तो सर्वस्व पणाला लावतो, तर नेटमध्येही फलंदाजीदरम्यान एकाग्रता पाळतो. विराटकडे पाहून आम्ही स्वत:च्या फिल्डिंगमध्ये एक टक्का जरी सुधारणा केली, तरी बरेच मिळविल्यासारखे होईल,’ असे तो म्हणाला. संघाकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत, हे युवा खेळाडूंना विराट विचारतो. खेळाडू या नात्याने प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असते. कर्णधार आणि कोच यांनी संघात रोटेशनची प्रक्रिया अवलंबल्याने सर्वांना संधी मिळाल्याचे प्रत्येक खेळाडूला समाधान असल्याचे कुलदीपने सांगितले.खेळायचे कसे, हे भारताकडून शिकाकोलंबो : भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघाला चारीमुंड्या चीत करण्यात पटाईत आहे. खेळताना कुणाचीही पर्वा न करता विजय साकारायचा कसा, ही कला कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या सहकाºयांकडून श्रीलंकेच्या खेळाडूंनी आत्मसात करायला हवी, असा सल्ला संघाचे काळजीवाहू कोच निक पोथास यांनी दिला आहे.कसोटी आणि वन डे मालिकेपाठोपाठ टी-२० मध्येही सहज विजय नोंदवून भारताने श्रीलंका दौरा अविस्मरणीय ठरविला. या दौºयात भारताचा हा नववा विजय होता. भारतीय संघाचे कौतुक करून पोथास म्हणाले, ‘‘आमचा संघ सध्या विकासाच्या प्रक्रियेत आहे. भारतीय संघ बराच अनुभवी असल्याने विजय मिळविण्यासाठी कुठलीही कसर शिल्लक ठेवत नाही. पराभवाच्या खाईतून बाहेर पडून विजय मिळविण्याची ताकद या संघात आहे. भारताविरुद्ध खेळताना त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न अपयशी ठरणे स्वाभाविक होते. आम्हाला त्यासाठी आणखी प्रतिस्पर्धी बनायला हवे होते. सामन्यात खेळताना कसा दृष्टिकोन बाळगायचा, हे आम्हाला भारताकडून शिकावे लागेल.’’तुम्ही विराटची खेळपट्टीवर धाव घेण्याची पद्धत पाहिली असेल. मैदानावर कर्णधार या नात्याने त्याला मिळणारा सन्मानही बघितला असेल. तो लोकांसाठी ‘रोल मॉडेल’ असल्याचे मत पोथास यांनी व्यक्त केले. कालच्या सामन्याबद्दल विचारताच पोथास म्हणाले, ‘‘विराटने संघात ज्या संस्कृतीचा विस्तार केला, ती अत्यंत प्रभावी आहे. भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघाचा सन्मान करतो; पण मैदानावर कुठलीही पर्वा न करता त्याला चारीमुंड्या चीत करण्याच्याच विचारात असतो.भारताच्या खेळातील डावपेचही वाखाणण्याजोगे आहेत. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील प्रत्येक जण देशासाठी योगदान देण्यास सज्ज दिसतो. आमच्या खेळाडूंना भारताकडून धडा घ्यावा लागेल. भारतीय खेळाडूंकडून काही गोष्टी आत्मसात करणे, ही लंकेच्या खेळाडूंसाठी काळाची गरज आहे.’’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- श्रीलंका दौ-यातील कामगिरी विशेष , यशाचे सर्व श्रेय सांघिक कामगिरीला : विराट
श्रीलंका दौ-यातील कामगिरी विशेष , यशाचे सर्व श्रेय सांघिक कामगिरीला : विराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:50 AM