गॉल : सलामवीर फलंदाज लाहिरू थिरिमानेच्या (१८९ चेंडू, नाबाद ७६ धावा) अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी शनिवारी इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात २८६ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद १५६ धावा करीत संघर्ष कायम राखला. श्रीलंका संघाला इंग्लंडची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप १३० धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत.
कर्णधार ज्यो रुटच्या (२२८) कारकिर्दीतील चौथ्या द्विशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ४२१ धावांची मजल मारली. रुटने ३२१ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व १ षटकार लगावला. दिलरुवान परेराने (४-१०९) त्याला बाद करीत उपाहारापूर्वी इंग्लंडचा डाव गुंडाळला. रुट ख्रिस गेल (३३३), वीरेंद्र सेहवाग (नाबाद २०१) आणि मुशफिकर रहीम (२००) यांच्यानंतर गॉल मैदानावर द्विशतकी खेळी करणारा चौथा फलंदाज ठरला. श्रीलंकेचा पहिला डाव १३५ धावांत संपुष्टात आला आहे.
दुसऱ्या डावात थिरिमानेने कुशल परेरासोबत (६२) सलामीला १०१ धावांची भागीदारी केली. त्याने आपल्या नाबाद खेळीत सहा चौकार लगावले. परेराने १०९ चेंडूंना सामोरे जाताना पाच चौकार व १ षटकार लगावला. त्याने ९१ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. तो वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या गोलंदाजीवर दुखापतग्रस्त झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कुशल मेंडिसला (१५) लीचने माघारी परतविले. त्याने थिरिमानेसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. त्याआधी, शुक्रवार (दि. १५) च्या ४ बाद ३२० धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडने पहिल्या डावात ४२१ धावांची मजल मारली. श्रीलंकेतर्फे परेराव्यतिरिक्त असिता फर्नांडोने (२-४४) बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक -
श्रीलंका पहिला डाव ४६.१ षटकांत सर्वबाद १३५. दुसरा डाव ६१ षटकांत २ बाद सर्वबाद १५६ (लाहिरू थिरिमाने खेळत आहे ७६, कुसल परेरा ६२, कुसल मेंडिस १५, कुरेन व लीच प्रत्येकी १ बळी).
इंग्लंड : पहिला डाव ११७.१ षटकांत सर्वबाद ४२१ (जो रुट २२८, डॅनियल लॉरेन्स ७३, बेयरस्टो ४७, परेरा ४-१०९, लसिथ एम्बुलडेनिया ३-१७६, फर्नांडो २-४४).
Web Title: Sri Lanka VS England, Lahiru Thirimanne's struggling play
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.