Sri Lanka vs New Zealand, 2nd Test : श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार धनंजया डी सिल्वा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम साउदीच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ या सामन्यातील विजयासह २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ पाहुण्यांना क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतला आहे. काळी पट्टी बांधून मैदानात उतरला न्यूझीलंडचा संघ
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या संघातील खेळाडू बाहीवर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. संघाचे माजी मॅनेजर इयान टेलर यांना आदरांजली वाहण्यासाठी खेळाडू काळी पट्टी बांधून खेळताना दिसत आहेत. इयान टेलर यांचे नुकतेच निधन झाले. ते १९८०-९० या कालावधीत मॅनेजरच्या रुपात न्यूझीलंडच्या टेस्ट टीमसोबत होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली खास पोस्ट
लंकेची खराब सुरुवात, पण मग करुणारत्ने अन् चंडिमलनं सावरला डाव
श्रीलंकेतील गाले क्रिकेट स्टेडियमवरच न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंड संघावर ६३ धावांनी पराभूत होण्याची वेळ आली. परिणामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत न्यूझीलंडचा संघ मागे पडला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातही श्रीलंकेच्या संघाने अगदी दमदार सुरुवात केली आहे. अवघ्या २ धावांवर निसंकाच्या रुपात पहिली विकेट गमावणाऱ्या यजमान श्रीलंकेनं दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चंडिमल यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलले आहे.