Sri Lanka vs Pakistan 2nd Test : पाकिस्तानी संघाची दुसऱ्या कसोटीत यजमान श्रीलंकेने खूप वाईट अवस्था केली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत चांगले पुनरागमन केलेले दिसतेय.. पहिल्या डावात ३७८ धावा उभ्या करताना त्यांनी दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानचे ७ फलंदाज १९१ धावांवर माघारी पाठवले आहेत. बाबर आजमनचा पाकिस्तान संघ अजूनही १८७ धावांनी पिछाडीवर आहे. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फवाद आलम ( Fawad Alam) याने कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडला. २००९मध्ये कसोटीत पदार्पण करणाऱ्या फवादला १००० धावांसाठी १३ वर्ष वाट पाहावी लागली.
श्रीलंकेने पहिल्या डावात ३७८ धावा केल्या. दिनेश चंडीमल ( ८०), निरोशान डिकवेला ( ५१), ओशादा फर्नांडो ( ५०), अँजेलो मॅथ्यूज ( ४२), कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( ४०) व धनंजया डी सिल्वा ( ३३) यांनी योगदान दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव गडगडला. आघा सलमान ( ६२) व इमाम-उल-हक ( ३२) यांनी चांगला खेळ केला. फवाद आलम २४ धावांवर पायचीत झाला. श्रीलंकेच्या रमेश मेंडीसने ३, प्रभात जयसूर्याने २ विकेट्स घेतल्या. या सामन्यात फवादने कसोटीतील १००० धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी फवादच्या खात्यात २८ डावांत ४१.०८च्या सरासरने ९८६ धावा होत्या. त्यात पाच शतकं व दोन अर्धशतकांचा समावेश होता.
२००९मध्ये त्याने पाकिस्तानकडून कसोटीत पदार्पण केले आणि त्यानंतर त्याला चौथी कसोटी खेळण्यासाठी ११ वर्ष वाट पाहावी लागली. त्यानंतर पुनरागमन करताना त्याने ४०च्या सरासरीने ७६० धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्धची १४० धावींची खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
Web Title: Sri Lanka vs Pakistan 2nd Test : Fawad Alam finally crosses the milestone of 1000 Test runs after 13 years of his debut, stump day 2 Pakistan finish the day on 191/7 trail by 187
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.