T20 Cricket Records: टी२० क्रिकेट मध्ये जवळपास सर्वच सामने रोमांचक होतात. काही काही सामने तर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतात. पण एखादा संघ अवघ्या ३० धावांवर ऑल आऊट झाला असेल तर त्या संघाचा पराभव होणं जवळपास निश्चित असते. पण श्रीलंकेत सुरू असलेल्या टी२० स्पर्धेत मात्र एक विचित्र गोष्ट घडली ज्याचा कोणी फार विचारही केला नसेल. श्रीलंकेत मेजर क्लब टी२० स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत kalutara town club आणि galle cricket club यांच्यात सामना खेळवण्यात आला आणि तो सामना टाय झाला. टी२० क्रिकेटच्या इतिहासात इतक्या कमी धावसंख्येवर सामना टाय होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
गॉल क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांमध्ये ३० धावा केल्या. या ३० धावांसाठी त्यांना ९ गडी गमवावे लागले. Kawsitha Kodithuwakku व्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. चार खेळाडूंना तर शून्यावर माघारी जावं लागलं. तसेच, ३० पैकी ६ धावा या अतिरिक्त प्रकारच्या होत्या. कालुतारा संघाची फलंदाजी तर अधिकच खराब झाली. या संघातील एकालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. ५ फलंदाजांना तर साधं धावांचं खातंही उघडता आलं नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या ८ अतिरिक्त धावांच्या मदतीने या संघाने ६ षटकांत ३० धावा केल्या आणि ९ गडी गमावले. त्यामुळे सामना टाय झाला.
पावसामुळे हा सामना ६-६ षटकांचा खेळवण्यात आला होता. दोन्ही संघांनी ३० धावांवर ९ गडी बाद हीच धावसंख्या गाठली. एकूण सामन्यांपैकी केवळ २ षटके अशी होती ज्यात कोणतीही विकेट गेली नाही. बाकीच्या प्रत्येक षटकात किमान एक तरी विकेट पडतच होती. सामन्यात उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी कमाल केली. त्याने एकूण १५ विकेट्स घेतल्या. कालुतारा क्लबचा स्पिनर इंशाका सिरिवर्धनाने २ षटकात ५ धावांत ५ बळी टिपले. तर गॉल क्लबच्या काव्सिताने सर्वाधिक १२ धावा केल्या.
दरम्यान, टी२० सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाते. पण या स्पर्धेच्या साखळी फेरीत सुपर ओव्हरचा नियम नसल्याने दोन्ही संघांना गुण विभागून देण्यात आले.
Web Title: Sri Lanka Weird T20 record as Match Tied on 30 runs by both the teams See Details kalutara town club galle cricket club
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.