कोलंबो - पॉवरप्लेतभारतीय संघाकडून निराशाजनक प्रदर्शन झाले. याचा फायदा श्रीलंकने उठवला. त्यामुळेच भारतीय संघाला तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला, असे भारतीय सलामीवीर शिखर धवनने म्हटले. त्याने यजमानांच्या विजयाचे श्रेय शानदार खेळी करणाºया कुसाल परेराला दिले.भारताने हा सामना ५ गड्यांनी गमावला. परेराने भारताच्या गोलंदाजांना ‘टार्गेट’ केले. त्याने ३७ चेंडूंत ६६ धावांची आक्रमक खेळी केली. भारतीय संघ पहिल्या सहा षटकांत २ गडी गमावून केवळ ४० धावाच करू शकला. त्यांनी २ षटकांत ९ धावांवर २ फलंदाज गमावले होते. दुसरीकडे, श्रीलंकेने पॉवरप्लेत २ गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. ज्यात परेराने दुसºया षटकात शार्दुल ठाकूरला ५ चौकार आणि १ षटकार ठोकत २७ धावा जोडल्या होत्या. त्या महागड्या ठरल्या.धवन म्हणाला, पहिल्या सहा षटकांत त्यांनी आमच्याकडून सामना हिसकावून घेतला होता. सहा षटकांनंतर चेंडूला टोलवणे कठीण जात होते. मध्य षटकांत असे होत नव्हते. खेळपट्टी संथ झाली होती. परेराने रोमांचक खेळी केली. ज्यात अर्धा डझन चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. परेराने एकाच षटाकात २७ धावा कुटल्या. त्यामुळे श्रीलंका संघ सहा षटकांनंतर ७५ धावांवर पोहचला होता आणि यामुळेच अंतर वाढले. सुरुवातीला दोन फलंदाज गमावणेही भारतासाठी महागडे ठरले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पॉवरप्लेत श्रीलंकेने सामना हिसकावला - धवन
पॉवरप्लेत श्रीलंकेने सामना हिसकावला - धवन
पॉवरप्लेतभारतीय संघाकडून निराशाजनक प्रदर्शन झाले. याचा फायदा श्रीलंकने उठवला. त्यामुळेच भारतीय संघाला तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला, असे भारतीय सलामीवीर शिखर धवनने म्हटले. त्याने यजमानांच्या विजयाचे श्रेय शानदार खेळी करणाºया कुसाल परेराला दिले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 2:09 AM