Join us  

श्रीलंकेच्या फलंदाजाने रचला इतिहास, एकाच सामन्यात झळकावली दोन द्विशतके

श्रीलंकेच्या अँजेलो परेराने हा नवा इतिहास रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 2:28 PM

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वामध्ये एकामागून एक बरेच विक्रम रचले जातात. पण श्रीलंकेच्या फलंदाजाने तर इतिहास रचला आहे. कारण तब्बल 80 वर्षांनंतर त्याने ही देदिप्यमान कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

श्रीलंकेच्या अँजेलो परेराने हा नवा इतिहास रचला आहे. नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबकडून खेळताना चार दिवसीय सामन्यात तब्बल दोन द्विशतके झळकावण्याचा पराक्रम त्याने केला आहे. ही कामगिरी करणारा परेरा हा श्रीलंकेचा पहिला फलंदाज आहे. परेराने पहिल्या डावात 201 आणि दुसऱ्या डावात 231 धावांची खेळी साकारली होती. दोन्ही डावांत दोन द्विशतके लगावण्याचा पराक्रम 1938 साली कोलचेस्टर येथे केंट या संघाकडून खेळताना आर्थर फॅग यांनी केला होता. इसेक्सविरुद्धच्या सामन्यात फॅग यांनी 244 आणि 202 धावांची खेळी साकारली होती.

परेराचा जन्म 23 1990 साली झाला होता. परेराच्या नावावर चार एकदिवसीय सामने आहेत. चार सामन्यांमध्ये परेराला फक्त दोन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या नावावर फक्त सात धावा आहेत. परेराने दोन ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये चार धावा केल्या आहेत.

टॅग्स :श्रीलंका