T20 World Cup 2022 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात गेलेला श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुणथिलकाला काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. दनुष्का श्रीलंकेच्या संघाचा सदस्य होता, परंतु दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. तरीही त्याला ऑस्ट्रेलियातच थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. या दरम्यान त्याची एका अॅपच्या माध्यमातून तरुणीशी भेट झाली आणि तिनेच खेळाडूवर बलात्काराचा आरोप केला. दनुष्काला ऑस्ट्रेलियात बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि मागील ११ दिवसांपासून तो तुरुंगात होता. पण, आज ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाने या क्रिकेटपटूला जामीन दिला आहे. दानुष्काला जामीन मिळवण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
एका महिलेच्या तक्रारीवरून दनुष्काला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, ३१ वर्षीय क्रिकेटरला रविवारी ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून रात्री १ वाजता अटक करण्यात आली. २९ वर्षीय महिलेने आरोप केला होता की, गुणथिलका यांनी घरातच लैंगिक अत्याचार केले.
महिला आणि क्रिकेटरची भेट एका ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे झाली. आणि दोघांनीही एकमेकांशी गप्पा मारायला सुरुवात केली होती. दोघांची भेट झाली होती. श्रीलंका क्रिकेटने या प्रकरणी या खेळाडूवर बंदी घातली आहे. या सगळ्यामध्ये दनुष्काला काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत. येथे दनुष्काला दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत त्याच्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. न्यायालयाने सर्वात मोठी अट घातली आहे की त्याला टिंडर आणि डेटिंग अॅप्लिकेशन्स वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"