वन-डेत थिसारा श्रीलंकेचा कर्णधार

पाकिस्तानविरुद्ध टी २० मालिकेत नेतृत्व क्षमतेचा ठसा उमटविणारा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा हा भारताविरुद्ध १० डिसेंबरपासून सुरू होणाºया तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंका संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:20 AM2017-11-30T01:20:07+5:302017-11-30T01:20:42+5:30

whatsapp join usJoin us
 Sri Lankan captain of One-day Thesaurus | वन-डेत थिसारा श्रीलंकेचा कर्णधार

वन-डेत थिसारा श्रीलंकेचा कर्णधार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो : पाकिस्तानविरुद्ध टी २० मालिकेत नेतृत्व क्षमतेचा ठसा उमटविणारा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा हा भारताविरुद्ध १० डिसेंबरपासून सुरू होणाºया तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंका संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे.
थिसाराला प्रथमच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधाराची जबाबदारी पार पाडण्याचा अनुभव आहे. गेल्या महिन्यात गद्दाफी स्टेडियमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत श्रीलंकेच्या दुय्यम दर्जाच्या टी २० संघाचा कर्णधार होता आणि भारताविरुद्धही टी २० मालिकेत तो याच भूमिकेत असणार आहे.
यावर्षी श्रीलंकेचा कर्णधार म्हणून अनेक वेळा बदल करण्यात आला आणि थिसारा हा २०१७ मध्ये वन डे संघाचे नेतृत्व करणारा पाचवा खेळाडू असेल.
झिम्बाब्वेविरुद्ध प्रथमच मालिका गमावल्यानंतर अ‍ॅन्जोलो मॅथ्यूजने आपल्या कर्णधारपदाचा त्याग केला होता. त्यानंतर उपुल थरंगा याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपविली होती; परंतु त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेला प्रथम भारत आणि नंतर पाकिस्तानकडून ५-० मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
थरंगा याआधी दक्षिण आफ्रिका दौºयात कार्यवाहक कर्णधार होता आणि तेव्हादेखील त्याच्या नेतृत्वाखालील संघाने पाच वन डे सामने गमावले होते. त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेचा संघ २२ पैकी फक्त ४ सामने जिंकू शकला होता. यादरम्यान चमारा कापुगेदारा आणि लसिथ मलिंगा यांनीदेखील प्रत्येकी एका सामन्यात कर्णधारपद भूषविले होते.


अन्य स्वरुपाविषयी विचार करता थिसारा यावर्षी संघाचा सातवा कर्णधार असेल. दिनेश चांदीमल आणि रंगना हेराथ यांनीदेखील यादरम्यानच कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविले. थिसाराने आतापर्यंत १२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या २८ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने डिसेंबर २००९ मध्ये क्रिकेटच्या या स्वरुपात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १४४१ धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत १३३ विकेटही घेतल्या आहेत.

Web Title:  Sri Lankan captain of One-day Thesaurus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.