दुबई, आशिया चषक 2018 : श्रीलंकेच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची हकालपट्टी करण्यात आली. संघातील अनुभवी खेळाडू असलेल्या मॅथ्यूजला या हकालपट्टीमुळे धक्का बसला आहे. पण त्याच्या हकालपट्टीचे कारणही तसंच गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.
मॅथ्यूजकडे बऱ्याच वर्षांपासून श्रीलंकेचे कर्णधारपद होते. त्याच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेला बऱ्यापैकी कामगिरी करता आली. पण आशिया चषक स्पर्धेत झालेला श्रीलंकेचा पराभव त्यांच्या क्रिकेट मंडळाच्या जिव्हारी लागलेला दिसत आहे.
आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेला बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याकडून साखळी फेरीत पराभव पत्करावा लागला. या पराभवांमुळे त्यांचे स्पर्धेत लवकर पॅकअप झाले. जर मॅथ्यूजच्या नेतृत्त्वाखाली असे संघ श्रीलंकेला पराभूत करू शकतात, तर विश्वचषकात त्यांच्या संघाला निभाव लागणार नाही, असा विचार त्यांच्या मंडळाने केला. त्यामुळे मॅथ्यूजकडून कर्णधारपद काढून दिनेश चंडिमलकडे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे.