श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदनंदा अलूठगमगे यांनी 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना फिक्स्ड असल्याचा दावा केला. भारत आणि श्रीलंका यांच्यात तो सामना खेळला गेला आणि भारतानं 6 विकेट्स राखून सामना जिंकला. भारतानं 28 वर्षानंतर वन डे वर्ल्ड कपवर पुन्हा नाव कोरले होते. पण, या सामन्यावर अनेकदा फिक्सिंगचे आरोप झाले आणि आता क्रीडा मंत्र्यांच्या दाव्यानं पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. अलूठगमगे यांच्या आरोपांनंतर श्रीलंका सरकारनं आरोपांची गंभीर दखल घेतली असून श्रीलंका क्रीडा मंत्रालयानं शुक्रवारी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.
IPL 2020 साठी आशिया चषक स्पर्धेबाबत तडजोड करणार नाही; पाकिस्तानची ठाम भूमिका
अलुठगमागे हे 2011मध्ये श्रीलंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यांनी सांगितले की,''मी या वक्तव्याची संपूर्ण जबाबदारी घेतो. फक्त मला याबाबत अधिक खुलासा करायचा नाही, कारण मला देशाची इभ्रत महत्त्वाची आहे. 2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स होती. यात कोणता खेळाडू सहभागी नव्हता, परंतु एक गट होता जो या कटात सहभागी होता.'' त्यांनी अप्रत्यक्षपणे कोणत्यातरी राजकीय पक्षाकडे बोट दाखवले. त्यानंतर सध्याचे क्रीडा मंत्री डल्लास अलहप्पेरूमा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दर दोन आठवडयांनी तपासाचा अहवाल सादर करण्याचेही त्यांनी सांगितले आहे.
विराट कोहलीच्या घरी गुड न्यूज? अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याचा फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य
अलूठगमगे यांच्या आरोपांवर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि माजी फलंदाज माहेला जयवर्धने यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. संगकारानं ट्विट केलं की,''मॅच फिक्स असल्याच्या आरोपाचे पुरावे त्यांनी आयसीसीकडे आणि भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे सादर करावेत. त्यानंतर त्यांच्या दाव्याची सखोल चौकशी केली जाईल.'' जयवर्धनेनंही ट्विट केलं. तो म्हणाला, निवडणूका जवळ येत आहेत वाटतं.. आता सर्कस सुरू होईल. नावं आणि पुरावे कुठेत?
अन्य महत्त्वाच्या बातम्या
प्रेग्नंट प्रेयसीला खूश ठेवण्यासाठी हार्दिक पांड्याची खटपट; स्पेशल गिफ्ट पाहून नताशा म्हणते...
भारतीयांवर भडकली 'पॉर्न स्टार' रेनी ग्रेसी; दिली कायदेशीर कारवाईची धमकी!
माझं घरच तू होतीस गं... आईच्या निधनानंतर SRHच्या क्रिकेटपटूला दुःख अनावर
सुशांत सिंग राजपूतला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही; मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला भावनिक
भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीच्या डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार, पण...
रिषभ पंत बनला 'हिरो'; जाणून घ्या शिखर धवनसह संघातील खेळाडूंना मिळाले कोणते चित्रपट!
हरभजन सिंग जगासमोर भारताची नकारात्मक छबी पसरवतोय; चिनी पत्रकाराची टीका